नगर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक व निंबवी, ता. श्रीगोंदा येथील रहिवाशी दत्तात्रय पांडुरंग शिर्के (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ, बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांनी एरंडोली, सारोळा सोमवंशी, विसापूर जेल, येळपणे अशा विविध ठिकाणी ३४ वर्ष ज्ञानदानाचे काम करून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. ते जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक व प्रगतशिल शेतकरी म्हणून परिचित होते. सावित्रीबाई फुले महाविद्यालय पिंपळगाव पिसा येथील प्रा. डॉ. रविंद्र शिर्के व गुणवंत शिक्षिका सौ. वैशाली शितोळे यांचे वडील होते. तर मुख्याध्यापक भाऊसाहेब शितोळे यांचे सासरे होते.