कोपरगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यामध्ये माजी सैनिकांची संख्या जवळपास सात लाखाच्या वरती असून त्यांच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. वीर पत्नी, माजी सैनिकांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना सैनिक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सुभेदार शांतीलाल होन यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकराव चव्हाण होते.
सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने वामनराव जावळे व कल्याण जावळे यांनी सुभेदार शांतीलाल होन व शंकरराव चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी न्यायाधीश मेघराज जावळे,जंगली महाराज आश्रमाचे कोषाध्यक्ष प्रा. विठ्ठल होन, प्रगतशील शेतकरी विनायक जावळे,शिवदास जावळे,पुंजाभाऊ जावळे, सिताराम जावळे, शिवदास जावळे, सचिव संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल जावळे, मोहन जावळे, भाऊसाहेब जावळे, राजेंद्र जावळे,शिवाजी जावळे, किशोर औटी, भास्कर जावळे अदी उपस्थित होते.
विनायकराव जावळे यांनी शेतकऱ्यांना व्यथा मांडताना शेतीमालाला भाव नाही दूध धंद्याला भाव नाही यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाट पाण्याबद्दल नियंत्रण राहिले नसून शेती पिकांना कालव्यांचे पाणी मिळणे दे भरोशाचे झाले आहे. यामुळे आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशी आवाहन त्यांनी केले. सुभेदार शांतीलाल होन व शंकरराव चव्हाण यांची झालेली निवड सर्वसामान्य जनतेच्या कामे लागण्यासाठी न्यायाधीश मेघराज जावळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार कल्याण जावळे यांनी मानले.