डॉ.अमोल बागुल वितरित करणार ५५५५ भारतीय तिरंगा ध्वज
अहमदनगर-
सांस्कृतिक मंत्रालय ,भारत सरकारच्या वतीने समस्त देशभरामध्ये भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ९ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.हे औचित्य साधून येथील उपक्रमशील शिक्षक डॉ.अमोल बागुल अल्प कालावधीमध्ये “माझा तिरंगा ” मोहिमेअंतर्गत सुमारे ५५५५ भारतीय तिरंगा ध्वज वितरित करणार असून यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य विशेष जागतिक विश्वविक्रमांसाठी नामांकन प्राप्त झाले आहे.
सांस्कृतिक मंत्रालय,भारत सरकार यांच्याकडून बागुल यांना भारतीय ध्वज तसेच हर घर तिरंगा मोहिमेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.या उपक्रमात पर्यावरणपूरक कागदी भारतीय ध्वज वितरित करणार असून विद्यार्थी,शिक्षक तसेच पालकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे तसेच ज्यांना माझा तिरंगा ध्वज हवा असेल त्यांनी ९५९५ ५४ ५५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.बागूल यांनी केले आहे.