पुञ प्रेमासाठी उमेदवारी दाखल केली नाही असे नाही तर वयोमानानुसार राजकीय व्यक्तींनी कुठेतरी थांबले पाहिजे देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
राजकारणात सेवानिवृत्ती नाही.पण वयोमानानुसार राजकारणातून बाजुला (सेवानिवृत्त) झाले पाहिजे. मी मुलासाठी त्याग केलेला नाही.परंतू काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार तरुणांना संधी मिळाली पाहिजे.माझा मुलगा व मी आज हि काँग्रेसमध्येच आहे.वेळेत एबी फाँर्म मिळाला नसल्याने सत्यजित तांबे यांचा अपक्ष फाँर्म दाखल केला आहे. तो महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच निवडणूक लढविणार आहे.विरोधी पक्षाने अधिकृत उमेदवार दिला नाही याचा अर्थ सत्यजित तांबे भाजपात जातील हा गैरसमज सर्वांनी दुर करावा. भाजपाने पाठींबा द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. अधिकृत पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने आम्ही सर्वच पक्षाला पाठींबा देण्याची विनंती करणार आहे. मी त्याग केलेला नाही फक्त तरुण उमेदवारास संधी मिळावी हेच उदिष्ट डोळ्या समोर असल्याने व पक्षाचा एबी फार्म असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डाँ.सुधीर तांबे यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. बाळासाहेब चव्हाण यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. स्व.चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डाँ.सुधीर तांबे आले असता त्यांना पञकारांनी काँग्रेसची उमेदवारी बाबत छेडले असता ते म्हणाले की,पुञ प्रेमासाठी उमेदवारी दाखल केली नाही असे काही नाही तर वयोमाना नुसार राजकीय व्यक्तींनी कुठेतरी थांबले पाहिजे.मी अनेकवेळा पदवीधर आमदार झालो आहे. मी माझ्या वया नुसार थांबणे गरजेचे होते.त्यामुळे मी थांबून घेतले आहे.सत्यजित तांबे यांना काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली होती.परंतू वेळेत एबी फाँर्म मिळाला नसल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या निवडणूकीत अधिकृत पक्षाचा एक हि उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सत्यजित तांबे हे महाविकास आघाडी कडूनच निवडणूक लढविणारे असल्याचे जाहिर केलेले आहे.
नाशिक पदविधर ममतदार संघातुन सत्यजित तांबे यांनी उमेदवारी दाखल केल्या नंतर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सुचक विधाना बाबत विचारले असता डाँ.तांबे म्हणाले की, कोणत्या पक्षाचे कोण काय बोलतो यापेक्षा आमची निष्ठा काँग्रेसवर आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार असलो तरी काँग्रेस पक्षात आम्ही राहणार आहे.भाजपाने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांनी संगमनेर येथिल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सत्यजित तांबे सारख्या तरुण नेतृत्वाला योग्य संधी दिली पाहिजे. असे वक्तव्य करुन भाजपात येण्याची खुली आँफर दिली होती. याबाबत विचारले असता मोठ मोठे राजकीय व्यक्ती आँफर देत असतात त्या स्वीकारायच्या की नाकारायच्या आपल्या हातात असतात. कोणी म्हटले म्हणजे सत्यजित याने भाजपात प्रवेश केला असा अर्थ होत नाही.असे आ.डाँ.तांबे यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे पिता पुञाने काँग्रेसला पक्षाला अंधारात ठेवून निर्णय घेतला का हे तपासले जाईल याबाबत विचारले असता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या समोर आमची बाजु आम्ही मांडणार आहे.आम्ही पिता पूञाने कोणाचाही विश्वासघात केलेला नाही.त्यांना काय तपासायचे ते तपासुद्या माञ मी एवढेच सांगेल की आम्ही पिता पुञांनी काँग्रेस सोडलेली नाही.सोडणार नाही.केवळ तांञिक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे.असे आ.डाँ.तांबे यांनी सांगितले.
आ.डाँ.तांबेनी काँग्रेसचा विश्वासघात केला;पटोले
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमाशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आ.डाँ.ताबे यांना काँग्रेस पक्षाकडून कोरा एबी फाँर्म पाठवला होता.जर आ.तांबे यांना उमेदवारी करायची नव्हती तर दिलेल्या एबी फाँर्मवर मुलाचे नाव टाकून उमेदवारी अर्ज का भरला नाही.तांबे पिता पुञांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आहे.या सर्व प्रकाराची तपासणी केली जाणार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.असे पटोल यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
महसुलमंञी विखेंच्या सुचक वक्तव्यामुळे घोळ झाला
राज्याचे महसुलमंञी राधाकृष्ण विखे यांनी सत्यजित तांबे भाजपाची उमेदवारी घेणार असेल त्यांचे पक्षात स्वागत आहे.याच विधानामुळे अनेकांची चलबिचल झाली. आ.डाँ.तांबे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहिर झालेली असताना उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उलट पुञ प्रेमासाठी माघार घेवून पुञाचा अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला. भाजपाच्या नेत्यांनी विखे थोराताच्या राजकारणात उडी मारुन आ.बाळासाहेब थोरात यांच्यासह तांबे पिता पुञाचा करेक्ट कार्यक्रम करण्यात उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्यासह ना.विखे यांचे डावपेच यशस्वी झाले.
काँग्रेसची बेडी,तर भाजपाची ईडी
काँग्रेस पक्षाची सत्ता असताना अनेकांच्या मागे पोलिसांची बेडी लावून राजकारण करण्यात आले. त्यावेळी यशस्वी ठरलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना माञ भाजची सत्ता आल्यानंतर भाजपाने ‘बेडी ऐवजी ईडी’ चा वापर करुन अनेक नेत्यांना तुरुंगाची हवा खायला लावली. त्याच प्रमाणे नाशिक पदवीधर मतदारसंघात असेच घडले असल्याची चर्चा आहे.आ.डाँ.तांबे पिता पुञाने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करु नये म्हणून ईडी मागे लावण्याची सुचना भाजपाच्या एका नेत्याने दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ईडीला घाबरुनच तांबे पिता पुञाने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नसावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमाशी बोलताना कोरा एबी फाँर्म दिल्याचे जाहिर केले आहे.कोरा एबी फाँर्म असतानाही काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे भाजपाच्या नेत्याची ईडीची सुचने बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.