नगर – भिंगार, माळगल्ली येथील श्री गणेश मित्र मंडळाने सालाबाद प्रमाणे पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून श्री गणेशाची मिरवणुक काढली. पारंपारिक ढोल पथक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध मिरवणुकीने भिंगारकरांचे लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी नागरिकांची स्वागत करुन दर्शन घेतले. यावेळी भिंगार पोलिसांनी ही सहकार्य केले.
लोकमान्य टिळकांचा वारसा जपणारे हे श्री गणेश मित्र मंडळाचे हे 38 वे वर्ष असून मंडळाने यावर्षी गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अक्षय धाकतोडे यांनी दिली.
यंदाच्या वर्षी मंडळाच्यावतीने पारंपारिक खेळ, विविध स्पर्धा, नृत्य असे मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आले आहेत तर महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंडळाने यावर्षी ऐतिहासिक देखावा सादर केला आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष समीर पांढरे यांनी केले.