मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंच्या हस्ते स्कूल बॅग भेट

0

कोळपेवाडी वार्ताहर – रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मा. आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यालयातील ७५ गरजू विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते स्कूल बॅग भेट देण्यात आली. या ७५ स्कूल बॅग साठी सुनील बोरा, डॉ. तुषार गलांडे, अमोलजी आढाव यांनी आर्थिक सहकार्य केले. या प्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे होते. सदर प्रसंगी सुनील बोरा , डॉ. तुषार गलांडे , अमोल आढाव, मुकुंद इंगळे , अशोक आव्हाटे , विरेन बोरावके , प्रशांत वाबळे, गणेश लकारे , विकास बेंद्रे , योगेश निकम , भाऊसाहेब भाबड, फकीर कुरेशी, बाळासाहेब रुईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद इंगळे यांनी केले. आ. आशुतोष काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून गरजू विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी असे  उपक्रम राबवून मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करून स्कूल बॅग साठी अर्थसहाय्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मन्सुरी सर यांच्या हस्ते आ. आशुतोषदादा काळे व मान्यवारांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. राजेभोसले मंगल , पर्यवेक्षिका श्रीम. जगताप मॅडम , श्रीम. औताडे मॅडम, श्री. शहाजी सातव, चैतन्य ढगे, देवराम साबळे, किरण बोळीज, सौं. जयश्री आंबरे, श्रीम. मनिषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम. मनिषा पाटील यांनी केले तर आभार काशिनाथ लव्हाटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here