मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काल 4 जानेवारी रोजी मुंबईत आले आहेत. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी, उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी त्यांनी हा दौरा केला आहे.
उत्तर प्रदेशात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट होणार आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ आणि त्यांचे मंत्री गुंतवणुकदारांना आमंत्रित करत आहेत. त्यासाठी ते विविध नेते, उद्योजकांची भेट घेत आहेत. आज 5 रोजी ते मुंबईत रोड शोही करणार आहेत.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची योगी आदित्यनाथ भेट घेतील.
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करतील.