मुबारक हो हज का सफर ,दुवाओमे याद रखना ….

0

पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बंधू-भगिनींना आ. आशुतोष काळेंनी दिल्या शुभेच्छा—–

कोळपेवाडी वार्ताहर :- मुबारक हो हज का सफर ,दुवाओमे याद रखना …. आपल्या शायरीच्या अंदाजात आमदार आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव येथे हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या .आपल्या शुभेच्छापर भाषांत आ. काळे म्हणाले की मुस्लीम समाजाने नेहमीच काळे कुटुंबावर प्रेम केले आहे.या प्रेमापोटी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील मुस्लीम समाज बांधवांनी समाजासाठी जे काही मागितले ते त्यांनी दिले आहे. त्या जाणीवेतून माझ्या पाठीशी देखील सर्व मुस्लीम समाज  उभा आहे. काळे कुटुंबाच्या शिकवणी प्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील समाजाच्या विकासासाठी सतत उभा आहे. . काळे परिवाराचे सर्वच समाजाशी भावनिक ऋणानुबंध असून यापुढील काळातही मुस्लीम समाजाबरोबरच सर्व समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बंधू-भगिनींचा काळे कुटुंबाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथे सत्कार सोहळा व हज यात्रेसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, काळे कुटुंबाच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या समाज बांधवांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे समाजातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांशी काळे कुटुंबाचे पारिवारिक ऋणानुबंध जोडले गेले आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब,माजी आमदार अशोकदादा काळे यांनी नेहमीच सर्वच जाती धर्माच्या आदर्श परंपरा व भावनांचा आदर केला असून हा वारसा मला पुढे चालविण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मागील साडे चार वर्षांत मतदार संघातील विकास कामाच्या माध्यमातून मला सर्वच समाजाची साथ मिळाली यात मुस्लीम समाजाची देखील तेवढीच तोलामोलाची साथ मिळाली सर्वच समाजाला सोबत घेवून त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत त्यामुळे चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा, माझ्या मतदार संघातील जनता सुखी व्हावी  यासाठी आपण माझ्यावतीने अल्लाहकडे दुवा मागावी अशी हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना आ. आशुतोष काळे यांनी विनंती केली. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, मौलाना आसिफ, मौलाना रिजवान, मौलाना मुख्तार, मौलाना निसार, मौलाना हाफिज बशीर, मौलाना अनिस आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण हजला जावू शकत नाही मात्र आपण त्यासाठी काय करू शकतो हि भावना मनात ठेवून या सर्व यात्रेकरूंची आयुष्यातील एवढी मोठी यात्रा यशस्वी व्हावी, त्यांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी हज यात्रेला जाणाऱ्या सर्व मुस्लीम बंधू भगिनींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्याचा आ. आशुतोष काळे यांनी मुद्दामहून हा कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्वांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी दुवा मागाल अशी अपेक्षा-सौ. चैतालीताई काळे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here