“मृत्यूचा सापळा ही नगर मनमाड महामार्गाची ओळख लवकरच पुसली जाणार ” :  स्नेहलताताई कोल्हे

0

रस्ते कामास सुरूवात रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी व सौ स्नेहलताताई कोल्हे यांचे कोपरगाव वासीयांनी मानले आभार

  कोपरगांव- दि. २६ डिसेंबर २०२२

 केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नामदार नितीन गडकरी यांनी वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला नगर मनमाड महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली त्याबददल कोपरगांव मतदार संघातील रहिवासी तसेच वाहनधारकांच्यावतीने मंत्री नितीनजी गडकरी व भाजपाच्या प्रदेश सचिव मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांना धन्यवाद दिले आहेत. नगर मनमाड महामार्ग मृत्युचा सापळा ही ओळख पुसून सुरळीत रस्ते वाहतुकीस प्राधान्य दिले जाणार असल्याने पंचक्रोशीतील वाहतुकदारांनी,महिलांनी तसेच नागरिकांनी सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सत्कार केला आहे. 

नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था इतकी भीषण झाली होती की दिवसेंदिवस अनेकांचे अपघात होऊन मृत्य घडत होते,शालेय विद्यार्थी व नागरिक हकनाक या रस्त्याचे बळी होत असल्याचे चित्र दूर करण्यासाठी सदर महामार्ग केंद्राकडे हस्तांतरण झाला व कामाला गती मिळाली.केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर येथे ऑक्टोंबर २०२१ रोजी आले असता त्यावेळीह निवेदन देवुन नगर मनमाड महामार्गावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईबाबा शिर्डी देवस्थानासह अन्य विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटकीय महत्वाची स्थानावर खड्डेमुक्त रस्ता तयार करावा म्हणून मागणी केली होती,त्याआधीही सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी वारंवार सदर महामार्ग दुरुस्ती बाबत आग्रही मागणी केली होती यासह तालुका भाजपाच्यावतीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी रस्तारोको आंदोलनही केले होते. त्यावर त्यांनी सावळीविहीर कोपरगांव ते मनमाड या एन एच ७५२ जी राष्ट्रीय महामार्गाच्या १९१ कोटी रूपये खर्चास मान्यता देवुन त्यास केंद्र अंतर्गत निधीची उपलब्धता केली.ज्यामुळे अनेक महिलांचे प्रपंच घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघात झाल्याने उघड्यावर आले होते.

 त्याचप्रमाणे दिवाळसणाच्या तोंडवर वाहतुकदारांना वाहने सुरळीत चालविता यावी यासाठी खडडे बुजवा म्हणून १३ ऑक्टोबर २०२२ भर पावसात ठिया आंदोलन केले होते. केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ता कामातील त्रुटींची पुर्तता करून सावळीविहीर कोपरगांव ते मनमाड एन एच ७५२ जो राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेवुन सर्वांनाच दिलासा दिला आहे त्याबददल नागरिकासह वाहतुकदारांनी मंत्री गडकरी यांचे आभार मानले व सौ.स्नेहलताताई कोल्हे यांना पाठपुरावा केल्याबद्दल धन्यवाद दिले आहे.

चौकट – असंख्य महिलांनी सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या संघर्षामुळे या रस्त्याचे काम होणार असल्याने त्यांचा सत्कार केला. मोठ्या कालखंडानंतर या महामार्गाची मृत्यूचा सापळा ही ओळख पुसली जाऊन आता सुखकर मार्ग होईल अशी जनभावना असल्याने नागरिक ना गडकरी व सौ.कोल्हे यांना धन्यवाद देत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here