मृत्यू नंतरही जगण्याचे महत्व सांगणारा आणि स्मशानातील सत्य मांडणारा मसुटा……

0

मनुष्य जो पर्यंत जिवंत तोपर्यंत सृष्ठी जिवंत , एकदाका मृत्यूने माणसाला गाठले की निदान त्याच्या एकट्यासाठी तरी जगाचा अंत झालेला असतो. मृत्य कोणालाही चुकलेला नाही , फक्त वयाच्या कोणत्या टप्प्यावर येतो त्यावरून त्याच चटका लावून जाणं ठरत. म्हातारपणी आलेला मृत्यू हळहळ व्यक्त करण्यापलीकडे नसतो मात्र अकाली, तरुणपणी आलेला मृत्यू चटका लावणारा ,नातलगांचा आक्रोश करणारा, कित्येक स्वप्ने अपुरे ठेवणारा असतो . मात्र अशातही मृत्यू नंतरही आपण कोणालातरी पुन्हा जीवनदान देऊ शकतो कोणाचा तरी आक्रोश ,दुःख कमी करू शकतो, कोणाला तरी पुन्हा सृष्टी दाखवू शकतो . ते केवळ मृत्यू पश्चात अवयव दान करून आपण आपल्या काही अवयवांच्या माध्यमातून जग पुनः पाहू शकतो आणि जग दाखवू ही शकतो . देहदान ,अवयवदान यासारख्या अत्यंत सवंदनशील विषयाला हात घालणारा आणि त्याचे महत्व पटवून देणारा चित्रपट म्हणजे मसुटा होय. तसेच एका म्हसणजोगी कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष, सामाजिक दुही, जातीयतेचा चटका , शिक्षणाचे महत्व अशा अनेक सामाजिक विषयांना अगदी बेधडक स्पर्श करणारा मसुटा सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसास नक्कीच अंतर्मुख करतो .

मसुटा मसणवट्यातील जिवघेण्या संघर्षाचे दाहक वास्तव तटस्थपणे प्रेक्षकांसमोर मांडतो..मुख्य प्रवाहात येऊ पहाणा-या मसणजोग्याच्या कुटूंबातील सदस्यांची फरफट दाखवताना सामाजिक दुही दाखवताना
निर्मीती मुल्ये उत्तम सांभाळतो. त्यात निखळ मनोरंजनच नाही तर सामाजिक प्रश्नही तेव्हढेच पोटतिडकीने मांडले आहे. असे असताना चित्रपट मनोरंजनात कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेतली आहे. आदर्श शिंदे यांचे वाजुदे – वाजुदे हे हळदीचे गाणे आधीच लोकप्रिय झाले आहे.

अनंत जोग यांच्यासह नागेश भोसले, ह्रदनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे कलाकारांनी कसदार अभिनय केला आहे.
यश मोरे या बालकालाकराचा अभिनय कौतुकास्पद आहे. या पूर्वीही काही हिंदी चित्रपट या विषयावर येऊन गेले आहेत, मात्र अगदी ग्रामीण स्थानिक पातळीवर अवयव दानाचे महत्व अगदी साध्या सोप्या भाषेत सांगणारा मसुटा चित्रपट नक्कीच वेगळा ठरतो. चित्रपटाची मांडणी जरी थोडीफार फिल्मी असली तरी ती सध्याच्या परिस्थितीत वेगळी वाटत नाही. मानवी संवेदनशीलतेला जागे करणारा एव्हढा मोठा विषय दिगदर्शक अजित देवळे यांनी अगदी चपखलपणे हाताळला आहे. काशीबाई फिल्मचे, चित्रपत्राचे निर्माते भरत मोरे , मनिष लोढा यांनी चित्रपट निर्मिती करताना कोठेही हात आखडता घेतला नाही. अगदी मुरलेले चित्रपट निर्मातेही सामाजिक विषयाला महत्व न देताना मसाला चित्रपट निर्मितीला प्राधान्य देतात . मात्र मोरे आणि लोढा सारखे ग्रामीण भागातील तरुण मसुटा सारख्या सामाजिक विषय मांडणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here