अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
संगमनेर : इतिहासातील थोर पुरुष हे युवकांसाठी सदैव आदर्श आहेेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पेमगिरी गडावर गेले असून अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आहे. अमृतवाहिनीचा हा मेधा महोत्सव उच्च गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवणारा असल्याचे गौरवउद्गार पानिपतकार व आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अमृत कला मंच येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, तुळशीनाथ भोर,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश, मॅनेजर प्रा. व्ही.बी. धुमाळ, मेधा समन्वय प्रा. जी.बी. काळे , डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ.बी एम. लोंढे, डॉ. मनोज शिरभाते , प्रा.एस. टि. देशमुख,सौ जे.बी. सेट्टी ,श्रीमती शीतल गायकवाड, अंजली कन्नावार, डॉ. संतोष खेडेकर,प्रा विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा कर्तबगार पुरुषांचा आहे .थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ अण्णासाहेब शिंदे यांसह राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याची राज्याला मोठी देन आहे. आमदार थोरात यांनी ग्रामीण विकासाबरोबर संगमनेर तालुक्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास घडवून संगमनेर तालुका हा राज्यात मॉडेल बनवला आहे.हा महाराष्ट्र संतांचा आणि वीर पुरुषांचा आहे .महाराष्ट्राला इतिहासाची मोठी परंपरा आहे. इतिहासातील थोर नायकांचा आदर्श घेऊन युवकांनी काम केले पाहिजे.सोशल मीडियाच्या जमान्यात अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा थोर पुरुषांच्या चरित्राचे वाचन आपण केले पाहिजे. संगमनेर तालुक्यातील शहागड येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचे तीन वर्षे गेले आहेत. शहाजी महाराजांनी पेमगिरी ही पहिली राजधानी बनवली होती असा हा समृद्ध इतिहासाचा साक्षीदार असलेला परिसर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अजून दहा वर्ष आयुष्य मिळाले असते तर त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेवर महाराष्ट्राचा झेंडा फडकवला असता.
विज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून विद्यार्थ्यांनी संघर्ष केला पाहिजे. इतिहासातील अनेक नायकांनी संघर्षातून नवा इतिहास केला निर्माण केला आहे. म्हणून कोणतेही कारण न सांगता जिद्द आणि आत्मविश्वास ठेवला तर प्रत्येकाला नक्की यश मिळेल असेही ते म्हणाले. रणजीतसिंह देशमुख म्हणाले की ,मेधा महोत्सवामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळत आहे.विद्यार्थ्यांमधील वेगवेगळ्या गुणांसाठी हे मोठे व्यासपीठ ठरले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी आशिष वर्पे यांनी केले, सूत्रसंचालन हर्ष कहांडळ यांनी तर तुलीका फटांगरे हिने आभार मानले.यावेळी सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- विविध उपक्रमांनी सजला मेधा महोत्सव
ढोल ताशे, लेझीम पथक ,आणि पारंपारिक पोशाखातील विद्यार्थी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध मॉडेलचे प्रदर्शन ,रांगोळी स्पर्धा, गायन, वादन, ड्रामा, मिमिक्री अशा विविध उपक्रमांनी हा मेधा महोत्सव सजला असून यामध्ये सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
चौकट :- आमदार थोरात यांच्या शुभेच्छा..!
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने मेधा महोत्सव होत असून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कलागुण दाखवण्याची संधी मिळत आहे. सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे सांगत काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मेधा महोत्सवाला ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.