मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते – सुमित कोल्हे

0

 कोपरगांव तालुका शालेय कवड्डी स्पर्धांचे उद्घाटन संपन्न
कोपरगांव: विद्यार्थी जीवनात क्रीडा स्पर्धा व खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे. विविध क्रीडा स्पर्धा व खेळांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये  प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये अत्यंत सकारात्मक दृष्ट्या  सामोरे जावु शकतात, हे निश्चित . मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले.
       

कोपरगांव तालुका शालेय क्रीडा समिती आणि संजीवनी संजीवनी सैेनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय १४, १७ व १९ वर्षे  वयोगटांतर्गत मुलांच्या कबड्डी  क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाचे उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. यावेळी सैनिकी स्कूलचे प्राचार्य कैलास दरेकर, संजीवनी इंग्लिश  मेडियम स्कूलचे प्राचार्य मोहसिन शेख, क्रीडा शिक्षक  राजेंद्र कोहकडे, राजेंद्र पाटणकर, शिवप्रसाद घोडके असे सुमारे साठ क्रिडा शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये एकुण ६६ संघांनी सहभाग नोंदविला.
       

सुमित कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य व भव्य क्रीडांगणे येथे उपलब्ध करण्यात आली आहे. खेळामध्ये हारजीतला महत्व न देता आपल्यातील कौशल्ये खेळाडूंनी दाखवावी, असे सांगुन कोल्हे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here