संगमनेर : विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लागली असल्याने संगमनेर शहर विकासाचे रोल मॉडेल ठरले आहे. अशातच पावसाळ्यात झालेल्या जास्त पावसामुळे शहरा जवळून वाहत असलेल्या म्हांळुगी नदीवरील पूलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे नदीवरील पूल खचला असून या पुलाच्या नवीन उभारणीसाठी काँग्रेसचेे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून लवकरच नवीन पूल उभारला जाणार असल्याची माहिती युुुवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पापडेजा म्हणाले की, काँग्रे्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य ठरले आहे. संगमनेर शहरात थेट निळवंडे पाईपलाईन योजनेद्वारे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत असून रस्ते, भूमिगत गटारे अशा पायाभूत सुविधा राबवल्या गेल्या आहेत. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व हरित संगमनेर ठरलेल्या या शहराला नुकताच देश पातळीवरील पुरस्कार मिळाला असून दहा कोटींचे बक्षीसही मिळाले आहे. मात्र मागील वर्षी सततच्या पावसाने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून हा पूल साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उपनगरातील रहिवासी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच गंगामाई परिसरात फिरण्यासाठी नागरिक या पुलावरूनच ये – जा करत असतात. म्हणून हा पूल तातडीने होण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मागणीला मान देऊन हा निधी नगर विकास विभागाकडून तातडीने मिळणार असून या निधीतून या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचेही निखिल पापडेजा यांनी सांगितले.या नवीन पुलामुळे या परिसरातील नागरिकांत व शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.