नगर – निती आयोग संलग्न सूक्ष्म लघु उद्योग कार्यालयामार्फत दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा ‘नॅशनल प्राईड अवॉर्ड’ यावर्षी युवा उद्योजक अमोल गाडेकर यांना मिळाल्याबद्दल शिरूर विभागीय पोलिस उपअधीक्षक यशवंत गवारी यांनी त्यांचा गौरव केला.
‘नॅशनल प्राईड अॅवॉर्ड’ हा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक व व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांना त्यांच्या सखोल कार्याची दखल घेऊन देण्यात येतो. युवा उद्योजक अमोल गाडेकर यांनी व्यवसाय व उद्योग क्षेत्रात केलेली कामगिरी अतुलनीय असून त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्काराबद्दल अमोल गाडेकर यांचे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.