आजचा रास्तारोको बेमुदत आंदोलन स्थगित
जामखेड तालुका प्रतिनिधी :
रत्नदीप कॉलेजमधील नर्सिंगच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेच्या नोडल ऑफिसर जोल्या बुधगावकर ह्या विद्यार्थीचे प्रश्न सोडविण्या ऐवजी रत्नदीप कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे व संचालकांशी संगनमत करून विद्यार्थ्यांची अडवणूक करत आहे जामखेड तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सकल मराठा या संघटनांसह विविध पक्षसंघटना, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आज दि. ३० रोजी बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ते स्थगित करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिलेल्या संघटनांचे प्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तसेच संबंधित विद्यापीठांचे अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सीगव्दारे मिटींग लावलेली उपस्थित या सर्वांची तहसील कार्यालयात एक बैठक पार पडली व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याचा मार्ग निघाल्याने आज रोजी करण्यात येणारे बेमुदत रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल इज्यूकेशन बोर्ड अंतर्गत असणाऱ्या नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यानच्या पिळवणूकी विरोधात आज दि. ३० रोजी सर्व विद्यार्थी, नागरिक व विविध पक्षसंघटनाचे प्रतिनिधी तहसिलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच महाराष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल बोर्ड मुबंईचे संचालक यांनी व्हिडीओ कॉन्फ्रास व दूरध्वनीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या सर्वांच्या उपस्थितीत जामखेड तहसील कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व आंदोलनाची भूमीका सविस्तरपणे मांडली. तसेच रत्नदीप नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थ्यांनी सर्व अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी रत्नदीप कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हे अर्थिक हेतूने आमचे परीक्षा फॉर्म भरून घेत नाहीत. अर्थिक पिळवणूक करत आहेत. आम्ही यापुढे त्या कॉलेजमध्ये अजीबात पाऊल ठेवणार नाहीत. आशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तसेच या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती तहसिलदारांना ग्रामस्थांनी केली. यावर महारष्ट्र राज्य नर्सिंग अँड पॅरामेडिकल बोर्ड मुंबईचे संचालक यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना लगेच विशिष्ट ईमेल आय. डी. उपलब्ध करून देऊन त्याव्दारे परीक्षा फॉर्म भरण्याची व्यवस्था करून दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर सर्व अडचणी सोडविण्याचे काम तहसिलदार गणेश माळी यांच्याकडे लेखी आश्वासन सपुर्द केले. या सर्व चर्चा, नियोजन व उपाययोजन यथा योग्य व समाधानकारक वाटल्याने आज दि. ३० मार्च रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले, मनसेचे प्रदिप टापरे, आरपीआय चे नेते सुनील साळवे, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते शहाजी राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, रमेश अजबे, डॉ. कैलास हजारे, आकाश घागरे, काका चव्हाण, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.