रत्नापुरच्या राष्ट्रवादीच्या उपसंरपचदी शोभा वारे यांची बिनविरोध निवड 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणाऱ्या रत्नापुर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा चंद्रकांत वारे यांची बिनविरोध निवड

 रत्नापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच राणी लक्ष्मण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. सकाळी १० वाजुन ५१ मिनीटांनी या बैठकीचे कामकाज सुरू झाले. उपसरपंच पदासाठी शोभा चंद्रकांत वारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी सुचक म्हणून शैलेश कदम होते विहित वेळेत उपसरपंच पदासाठी शोभा वारे यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी दोन वाजता सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी शोभा वारे यांची रत्नापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

        यासाठी रत्नापुरच्या सरपंच राणी जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य मनिषा वारे,मधुकर वराडे, शैलेश कदम, सिमा कदम, नवनाथ साळवे, निजाम शेख,अशा महारनवर या सदस्यांनी सहकार्य केले. तर सांगवी मुसलमानवाडी या प्रभागातील सदस्यांनी मुक पाठिंबा दर्शविला होता शोभा वारे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर समर्थक कार्यकर्तेंनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

          यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की राजकारण हे निवडणूकी पुरतेच आहे आता निवडणूक संपली त्यामुळे जो देगा उसका भला! जो नही देगा उसकाही भला हो या काव्य पंक्तीप्रमाणे ऐकमेकांशी वागावे गाव आपला आहे . आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गावचा विकास करायचा आहे.  रत्नापुर गावाचे नाव जिल्हापातळीवर अव्वल राहाण्यासाठी प्रयत्न करणार आहे . गावातील वीज, रस्ते,  रोज पिण्याच्या शुध्द पाण्याची वितरण व्यवस्था,शेतीसाठी पाणी याच बरोबर ग्रामपंचायतसाठीच्या विविध योजना सरपंच उपसरपंच सदस्य यांनी प्रभावी पणे राबविण्यासाठीच्या असल्याचे त्यांनी सांगितले ३३केव्ही हे रत्नापुर गावच्या विकासाचे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणी ते लवकरच मार्गी लागेल. 

      विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बबन ढवळे म्हणाले की रत्नापुर ग्रामपंचायतमध्ये आम्ही इतिहास घडविला आहे. एकाच प्रभागातून पती-पत्नीला उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. त्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. सरपंच राणी जाधव यांनी बोलताना सांगितले की सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. यावेळी उपसरपंच शोभा वारे,सदस्य शैलेश कदम, मधुकर वराडे, दिलीप वारे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here