मुंबई : रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
“आम्हाला आतापर्यंत येथे बंगले आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. तर संबंधित ठिकाणी बंगले नाहीत, असं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे सदर जागेवरील बंगल्यांचं काय झालं? याची चौकशी करावी,” अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांकडे केली आहे.
किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
“सोमय्यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, ते सिद्ध करायला लावा, ते तुमच्या लॉंड्रीत कसे स्वच्छ झाले? ते आधी सांगा…, मग दुसऱ्यांवर आरोप करा,” अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली.