सोनेवाडी( वार्ताहर ) : राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मिळालेले वरिष्ठ पद हे नेहमी समाजाच्या उपयोगासाठी आणले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो या प्रमाणे आपण काम केले पाहिजे. कैलास रहाणे यांना कोपरगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद मिळाले आहे. ते या पदाचा समाजाच्या हितासाठी नक्कीच उपयोग करतील असे प्रतिपादन भामाठाम येथील अडबंगनाथ देवस्थानचे महंत अरुणनाथगिरी महाराज यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे भाऊसाहेब संतुजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी तुकाराम गुडघे, भाऊसाहेब गुडघे, आण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब काकडे ,माजी सरपंच रामनाथ शिंदे, नानासाहेब गुंजाळ, दिलीप गुडघे, अनिल नवले ,शिवाजी शिंदे ,शिवाजी गुडघे , चांगदेव गुडघे अदी उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी मधील कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष पद कैलास रहाणे यांना मिळाल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या अनेक समस्या त्या वरिष्ठ पातळीवर मांडून सोडवण्याचा प्रयत्न करतील. तर कैलास रहाणे यांनी सांगितले की माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे , कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बीजेपीच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर पडली आहे निश्चितच येणारे सर्व प्रश्न आमच्या पातळीवर सोडण्याचे काम मी करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सुत्रसंचालन व आभार दिलीप गुडघे यांनी मानले.