शिर्डी : अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातिभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नितीन शिंदे यांनी , राष्ट्रीय काँग्रेसचे लोकसभा निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे केली आहे, .
- .
- आज शिर्डी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक लोकनेते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री व अहमदनगर जिल्हा शिर्डी व दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थित संगमनेर येथे संपन्न झाली.
- यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड यांचा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे व सहकाऱ्यांच्या वतीने गुलाब पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
- यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,आमदार लहू कानडे,शिर्डी लोकसभेचे समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे, माजी नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे, ज्ञानदेव वाफारे,राहता विधानसभा काँग्रेसचे नेते सुरेश थोरात,संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तरेतील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व विभागातील पदाधिकारी व काँग्रेसजन उपस्थित होते.
- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक चंद्रकांत हडोरे,तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे घराणेशाहीचा ठप्पा नसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य यांना अहमदनगर जिल्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मागणी करण्यात आली
- यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन शिंदे यांनी वाघमारे यांना शिर्डी लोकसभेचे उमेदवारी मिळावी अशी सर्वांच्या वतीने मागणी केली,या मागणीला पाठिंबा भटक्या विमुक्त काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहिदास चव्हाण, अनुसूचित काँग्रेसचे प्रदेश महासचिव बंटी यादव,निराधार निराश्रित काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शाहीर रेवनाथ देशमुख, निराधार निराश्रित काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई उनवणे, सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर कडू पाटील, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे,परिवहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, जिल्हा काँग्रेसचे कार्य-अध्यक्ष संतोष गायकवाड, अनुसूचित जात विभाग सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन बोर्डे,भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पातारे,अनुसूचित जाती जमाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक माळी,अनुसूचित जाती काँग्रेसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, तालुका उपाध्यक्ष सोपान धनक, परिवहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष छबु शिंगाडे,आदींना जोरदार मागणी करत राजेंद्र वाघमारे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे केली.
- यावेळी नितीनराव शिंदे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी काँग्रेसने सामान्य तळागाळातील स्थानिक माणसाला उमेदवारी द्यावी अशी ही मागणी केली.