राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे -महेंद्र विधाते

0

कोपरगाव प्रतिनिधी- सम्यक फाउंडेशन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून सामान्यांची सेवा करत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील फाउंडेशन करत असते. याही वर्षी अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान 31 मे 2023 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे .त्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी दहा मे पर्यंत संस्थेच्या कार्यालयात आपला प्रस्ताव सादर करावा. पुरस्कार कमिटीच्या तपासणीनंतर पुरस्कार घोषित करून त्यांना 31 मे रोजी सन्मानित करण्यात येईल असे फाउंडेशन महिंद्र विधाते यांनी सांगितले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here