राज्यस्तरीय सुवर्णपारखी संघटनेच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी मुकुंद बुऱ्हाडे तर उपाध्यक्षपदी प्रसाद मैड

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                गोल्ड असोसिएशन महाराष्ट्र ( रजिस्टर ) या राज्यस्तरीय सुवर्णपारखींच्या संघटनेच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी येथील सराफ मुकुंद दिगंबर बुऱ्हाडे यांची तर उपाध्यक्षपदी सराफ प्रसाद भगवान मैड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे .

           असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्ष  पुरुषोत्तम काळे , कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर , मुख्य संघटक भैय्या भाऊ भामरे , प्रशासकीय सचिव सतीश पितळे यांनी नुकतेच सदर नियुक्तीपत्र बु-हाडे व  मैड यांना दिले . सराफ मुकुंद बुऱ्हाडे हे राहुरी सराफ संघटना व कारागीर संघटनेचे सदस्य असून साई आदर्श मल्टीस्टेट संस्था चे ते अधिकृत गोल्ड व्हॅल्यूवर आहेत , तर प्रसाद मैड हे एडीसीसी बँक राहुरी व स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेचे अधिकृत गोल्ड व्हॅल्यूवर आहेत .

 त्यांच्या नियुक्तीचे असोसिएशनचे उपाध्यक्ष नचिकेत भुरके , राजाभाऊ वाईकर , खजिनदार दीपक देवरुखकर , उपखजिनदार कालिदास कांदळगावकर तसेच राहुरीतील सदस्य संतोष मैड , सागर मुंडलिक , मुकुंद वेदपाठक ,विश्वास बुऱ्हाडे , किरण नांदुरकर , आदींनी अभिनंदन केले आहे . राहुरी सह उत्तर नगर जिल्ह्यात गोल्ड व्हॅल्यूवर सभासद वाढवणे व येत्या 28 जानेवारीला मुंबई येथील सोने परीक्षण करणाऱ्या गोल्ड व्हॅल्युएरचे असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या कार्यशाळेसाठी अधिकधिक प्रतिनिधी सहभागी करण्याचा मानस बुऱ्हाडे व मैड यांनी व्यक्त केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here