नगर – महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या इ.5 वी पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, यामध्ये नगर, सावेडी येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी चि.कृष्णा रविंद्र चन्ना याने 294 पैकी 280 गुण मिळवत राज्यात चौथा तर जिल्ह्यात शहरी विभागात पहिला येण्याचा मान पटकाविला.
या परिक्षेस राज्यातून सुमारे 1 लाख 22 हजार 636 विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी 16,691 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. चि. कृष्णा चन्ना यास प्रिन्सीपल निलिमा रॉड्रीक्स, सौ.जयश्री कासवा, आई सुरेखा, वडिल रविंद्र चन्ना, बहिण कु.सई चन्ना यांचे मार्गदर्शन लाभले.
कु.कृष्णा चन्ना यांने यापुर्वी गणित प्रज्ञा परिक्षत जिल्ह्यात प्रथम, हेडगेवार प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्ह्यात प्रथम, तर दरवर्षी ऑलिपियाड स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.