राधाबाई काळे महिला महाविद्यालयात “जागतिक उद्योजकता दिवस” उत्साहात साजरा. 

0

अहमदनगर: रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात  ‘कौशल्य विकास उद्योजकता विकास आणि इंक्युबॅशन समिती ‘अंतर्गत उद्योजकतेच्या नवीन संधी व जनजागृती करण्यासाठी, २९ ऑगस्ट, २०२३ रोजी “जागतिक उद्योजकता दिवस “साजरा करण्यात आला . त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ,प्रसिद्ध उद्योजक ,ऊर्जा दूध, कुतवळ फूड प्रा. लि. पुणे, प्रकाश कुतवळ उपस्थित होते.  याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे होते.श्री प्रकाश कुतवळ यांनी आपल्या व्याख्यानामध्ये व्यवसायातील संधी, व्यवसायासाठी लागणारे कौशल्य व मार्केटिंग स्किल यावरती मार्गदर्शन केले .तसेच त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये  कोणत्याही उद्योग व्यवसायासाठी प्रामाणिकपणा , सातत्य असणे गरजेचे आहे , त्याचबरोबर मार्केटिंग साठी पॅकिंग, प्रोसेस आणि प्राईज हे देखील महत्त्वाचे आहे असे नमूद केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास व उद्योजकता विकास आणि इंक्युबॅशन समिती चेअरमन प्रा. डॉ. रोहिणी शेळके यांनी केले . पाहुण्यांची ओळख डॉ.गोपाळ राऊत यांनी करून दिली.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी उद्योजकता विकास या विषयावरती मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे आभार प्रा. भक्ती तांबे यांनी मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. ऋतुजा चव्हाण हीने केले. या कार्यक्रमासाठी प्रा .डॉ. शंकर केकडे, प्रा.डॉ.गोपाळ राऊत ,प्रा. भक्ती तांबे, आय. क्यू. सी समन्वय खान सर, प्रा. डॉ. लक्ष्मी काथवटे, प्रा.विलास एलके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थिनींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here