संगमनेरचा : तालुक्यातील निमगावजाळी येथील संकेत राजेंद्र जोंधळे यांची रायगड येथील सिव्हिल रुग्णालयात समुदाय आरोग्य आधिकारी म्हणुन नियुक्ती झाली आहे.
संकेतचे आई आणि वडील हे वडिलोपार्जीत शेती व्यवसाय करतात,आई वडिलांनी अतिशय मेहनत करून संकेतला शिकवले.संकेतने आपले शिक्षण लोणीच्या प्रवरा मेडिकल कॉलेज मध्ये पुर्ण केले व पुढे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने समुदाय आरोग्य अधिकारी ( सीएचओ ) या पदाला गवसणी घालत त्यांची रायगड येथील सिव्हिल रुग्णालयात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. संकेतच्या या नियुक्ती बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, नगर दक्षिणचे खा डाॅ सुजय विखे पाटील, डाॅ राजेंद्र विखे पाटील, युवक कार्यकर्ते सुमित डेंगळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल पावसे यांच्यासहित निमगावजाळी व परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.