राशिभविष्य /दिनविशेष /पंचांग

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, गुरुवार, दि. २७ जुलै २०२३, अधिक श्रावण शुक्ल नवमी दुपारी ३ वा. ४८ मि. पर्यंत नंतर दशमी, चंद्र- तुला राशीत,  नक्षत्र- विशाखा, सुर्योदय- सकाळी ६ वा. १५ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १५ मि. 

नमस्कार आज चंद्र तुला राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज शुक्र – चंद्र  व बुध – चंद्र केन्द्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर वृषभ, वृश्चिक व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

  दैनंदिन राशिभविष्य

मेष  – दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.  प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल. चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. काही अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. प्रवास टाळावेत.

मिथुन –  बौद्धिक प्रगती होईल. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. जुने मित्रमैत्रिणी भेटतील.

कर्क – मानसिक प्रसन्नता लाभेल. कामाचा ताण कमी राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. नोकरीत प्रगती होईल. व्यवसाय वाढेल. स्वास्थ व समाधान लाभेल.

सिंह – प्रवास होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत रहाणार आहात. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

कन्या – कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल वाढेल. गुप्तवार्ता समजेल.

 तुला – तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. प्रवासाचे योग येणार आहेत. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक – कामाचा ताण राहील. मनोबल चांगले ठेवणे गरजेचे आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. 

धनु –  आर्थिक कामात सुयश लाभेल. कामाचा ताण कमी होईल. काही अनपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन परिचय होतील.

मकर – मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा प्रभाव वाढेल. कामे मार्गी लागणार आहेत. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल उत्तम राहील.

कुंभ – जिद्द वाढेल. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवासाचे योग येतील. 

मीन – कामे विलंबाने होतील. कामाचा ताण राहील. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहणार आहे. हितशत्रुंवर मात कराल.                   

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४ GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here