शके १९४५, शोभननाम संवत्सर, मंगळवार, दि. ८ ऑगस्ट २०२३, अधिक श्रावण कृष्ण अष्टमी, कालाष्टमी, चंद्र- मेष राशीत, नक्षत्र- भरणी, सुर्योदय- सकाळी ६ वा. १९ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. १० मि.
नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, चंद्र – मंगळ त्रिकोणयोग, बुध – चंद्र त्रिकोणयोग, गुरु – चंद्र युतीयोग व शुक्र – चंद्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क,सिंह, तुला, धनु मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आरोग्य उत्तम राहील. सकारात्मक विचार राहतील. आनंदी व आशावादी राहाल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांंवर लादण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ : अनावश्यक खर्च संभवतात. कामे नकोशी होतील. मनाविरुद्ध घटना संभवते. आरोग्य जपावे. प्रवासामध्ये अनपेक्षित अडचणी संभवतात. काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा नको.
मिथुन : व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येणार आहेत.
कर्क : नवी दिशा सापडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान लाभेल. अधिकार प्राप्त होईल. व्यवसायातील मह्त्त्वाचे व्यवहार यशस्वी होणार आहेत. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे.
सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. आरोग्य सुधारेल.
कन्या : प्रकृतीच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अतिउत्साहीपणा टाळावा. बेकायदेशीर गोष्टींपासून दूर राहावे. मनस्ताप संभवतो. प्रवास टाळावेत.
तुळ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. प्रवासास दिवस अनुकूल आहे. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. दैनंदिन व इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. प्रभाव वाढेल.
वृश्चिक : मनोबल कमी असणार आहे. खर्च वाढणार आहेत. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिकूलता राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.
धनु : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रियजन भेटतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील.
मकर : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल.
मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कुटुंबामध्ये आनंद वातावरण राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. जुनी येणी वसूल होतील.
आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४