राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग

0

  आजचा दिवस 

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन कृष्ण प्रतिपदा, शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर २०२४, चंद्र – मेष राशीत, नक्षत्र – अश्विनी दु. १ वा. २६ मि. पर्यंत नंतर भरणी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १२ मि. 

नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज चंद्र – बुध प्रतियोग व चंद्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु. मकर, कुंभ क मीन या राशीना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशीना प्रतिकूल जाईल. 

                                                                                   

      दैनंदिन राशिभविष्य                                                                            

  मेष  : आज तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामाचा ताण कमी होणार आहे. प्रवासाकरिता दिवस अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन कामे होतील. 

वृषभ : दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनावश्यक खर्च होणार आहेत. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. वादविवाद टाळावेत.

मिथुन : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.  काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ होईल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील.

कर्क : नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासात अनुकूलता लाभेल. उत्साही व आनंदी रहाल. 

सिंह : तुमचे मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण होईल. उत्साही रहाल. 

कन्या : आरोग्य जपावे. आज आपण आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता ठेवावी. मनोबल कमी राहील. 

तुळ : गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल.  

वृश्‍चिक : प्रवास आज नकोत. अनावश्यक कामांमुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज आपल्याला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  

 धनु : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. प्रियजनांना खुश करण्यात व्यस्त रहाल. 

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी रहाल. 

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात उत्साह वाटेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल.

मीन : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील. काहींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here