आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३, निज श्रावण कृष्ण पंचमी, चंद्र – मेष राशीत, नक्षत्र – अश्विनी सकाळी ९ वा. २७ मि. पर्यन्त नंतर भरणी, सुर्योदय- सकाळी ६ वा. २५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५० मि.
नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र त्रिकोणयोग, चंद्र – बुध त्रिकोणयोग, गुरु – चंद्र युतीयोग, शुक्र – चंद्र केंद्रयोग व गुरु – बुध त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंदी व आशावादी राहणार आहात.
वृषभ : मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. आरोग्य जपावे. कामात दिरंगाई होणार आहे. काहींचा करमणुकीत दिवस वाया जाईल. प्रवास नकोत.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. बौद्धिक प्रभाव राहील. वैचारिक बदल होतील.
कर्क : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे सहज पार पडतील.
सिंह : मानसिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवुन द्याल. जिद्दीने कार्यरत राहणार आहात.
कन्या : वाहने सावकाश चालवावित. मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. दैनंदिन कामे विलंबाने होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत.
तुला : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामचा ताण राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन व इतर कामे मार्गी लागतील. तुम्ही आपल्या मतांवर ठाम रहाल.
वृश्चिक : प्रवास शक्यतो नकोत. आज काहींचा करमणुकीकडे तर काहींच्या अध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. प्रियजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. काहींना विविध लाभ होतील.
मकर : मनोबल उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिक सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होणार आहे.
कुंभ : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. साडेसातीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागेल. शांत व संयमी रहावे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन : आर्थीक कामास अनुकूलता प्राप्त होईल. व्यवसायातील कर्जप्रकरणे, जुनी येणी वसूल होतील. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४