शके १९४५, शोभननाम संवत्सर, सोमवार, दि. ३१ जुलै २०२३, अधिक श्रावण शुक्ल चतुर्दशी, चंद्र- धनु राशीत, नक्षत्र- पूर्वाषाढा, सुर्योदय- सकाळी ६ वा. १६ मि. , सुर्यास्त- सायं. १९ वा. १४ मि.
नमस्कार आज चंद्र धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज गुरु – चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कर्क व मकर या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष- उत्साही रहाल. उमेद वाढेल. छोटे प्रवास होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक अनुभव येतील.
वृषभ- आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन- कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
कर्क- विनाकारण खर्च संभवतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील. कायदेशीर बाबी सांभाळा.
सिंह- आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन परिचय होतील. प्रवास होतील.
कन्या- आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
तुला- उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. चिकाटीने कार्यरत रहाल. प्रवास होतील.
वृश्चिक- आर्थिक कामात सुयश लाभेल. हितशत्रूवर मात कराल. मतभेद कमी होतील. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
धनु- मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
मकर- खर्च होतील. वाहने सावकाश चालवावित. अतिउत्साहिपणा टाळावा. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.
कुंभ- प्रियजन भेटतील. आर्थिक लाभ संभवतात. नवीन परिचय होतील. बौद्धिक व वैचारीक परिवर्तन होईल. मनोबल वाढेल.
मीन- मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुधारेल. मनोबल वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आरोग्य सुधारेल.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत. जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४ आहे.