आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर २०२३, भाद्रपद शुक्ल सप्तमी, गौरी पूजन ,चंद्र – वृश्चिक राशीत दुपारी ३ वा. ३५ मि. पर्यंत नंतर धनु राशीत, नक्षत्र – ज्येष्ठा दुपारी ३ वा. ३५ मि. पर्यन्त नंतर मूळ, सुर्योदय- सकाळी ६ वा. २९ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ३४ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत दुपारी ३ वा. ३५ मि. पर्यन्त रहात असून नंतर तो धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस आनंदी दिवस आहे. आज रवि – चंद्र केंद्रयोग, चंद्र – शनि लाभयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह उत्तम राहील. रखडलेली व दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कामे यशस्वी होणार आहेत.
वृषभ : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण राहील. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : दुपारनंतरचा दिवस तुम्हाला अनुकूल जाणार आहे. हितशत्रुंवर मात करणार आहात. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
कर्क : दुपारनंतरचा दिवस प्रतिकूल आहे. अनावश्यक कामे करावी लागतील. तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृती जपावी. प्रवास नकोत.
सिंह : स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णयावर दुपारनंतर विचार कराल. काहींना दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. खर्च कमी होतील.
कन्या : नातेवाईकांचे सौ‘य लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. वरिष्टांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. भाग्यकारक घटना घडेल.
तुळ : महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. कामाचा ताण राहणार आहे. स्वास्थय लाभेल.
वृश्चिक : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. चिकाटी वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
धनु : दुपारनंतर तुमचे मनोबल वाढणार आहे. दिवसाची सुरुवात जरी अडचणीची झाली तरी दुपारनंतर अडचणी कमी होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण राहील.
मकर : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात अडचणी संभवतात. तुमची एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील.
कुंभ : दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ होतील. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. चिकाटी वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल. प्रवास होतील.
मीन : आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत प्रगती होईल. हितशत्रुंवर मात कराल. चिकाटीने कार्यरत रहाल.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४