राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय शरद पवारांकडून अखेर मागे

0

मुंबई : “कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असं शरद पवार यांनी आज (5 मे) पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं.

शरद पवार पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही.”

उत्तराधिकारी निर्माण करण्याच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले की, “मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन नेतृत्त्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.”

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे –

  • *जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा होती
  • *माझ्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले
  • *कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली
  • *माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही
  • *नवं नेतृत्त्व घडवण्यावर भर देणार
  • *उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here