कुकाणा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवा, आगामी काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्षाने केलेले काम जनतेसमोर मांडून शरदचंद्रजी पवार यांचे सामाजिक कार्य , सर्वच क्षेत्रात प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी कुकाणा ता.नेवासा येथे आयोजित शरद क्रीडा महोत्सवानिमित्त साहेब चषक २०२२ खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी केले. यावेळी,मा.आ.पांडुरंग अभंग,युवानेते सभापती क्षितीजभैय्या घुले, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस अब्दुल हाफिज शेख ,यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल अभंग,ललीत भंडारी यशराज चे राहुल जावळे,जुनेद शेख, राजेंद्र बागडे,राजेंद्र म्हस्के विलास लिपणे,जावेद शेख, राहुल भारस्कर, कुलदीप देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नेवासे तालुकाध्यक्ष सागर महापूर, कार्याध्यक्ष अभिराजसिंह आरगडे, गणेश फासे, सुनील तांबे, दादा गवळी ,प्रा.कुलदिप देशमुख, पत्रकार समीर शेख आदी उपस्थित होते. विकास शेळके, अश्वमेध क्रिकेट क्लबचे सदस्य यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन, सरपंच विठ्ठलराव अभंग मा.सरपंच दौलत देशमुख, उपसरपंच सोमनाथ कचरे, बाळासाहेब गर्जे, यांच्या हस्ते करण्यात आले .