राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या 35 व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 

0

कोपरगाव : कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमात श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची 35 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज, अध्यक्ष दत्तात्रेय होळकर यांनी दिली आहे. भव्य जपानुष्ठान व श्री गुरुचरित्र पारायण व दत्तयाग यज्ञ सोहळा या निमित्ताने होत आहे. शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 

आश्रमात दररोज पहाटे पाच ते सहा नित्य नियम विधीचे पठण, काकड आरती, व अनुष्ठाणार्थी करिता  महंत रमेशगिरी महाराजांचे सत्संग प्रवचन होत आहे. सकाळी ७.३० वा आरती, ८.०० वाजता जपानुष्ठानार्थीना चहापाणी, व तदनंतर अकरा वाजेपर्यंत अर्जुन महाराज दिघे यांच्या समवेत गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायण, शिवभक्त भाऊ पाटील यांची प्रवचने व अनंत लावर गुरुजी यांच्या कडून श्री दत्तयाग यज्ञ सोहळा 10 11 व 12 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. 

शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी रमेशगिरी महाराजांचे रात्री आठ वाजता प्रवचन झाले. 7 डिसेंबर रोजी दिनेशगिरी महाराज ,विश्वेश्वरानंद गिरी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. 9 डिसेंबर रोजी पांडुरंग महाराज वावीकर यांची जाहीर हरिकीर्तन झाले. काल रात्री आठ वाजता बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. आज बुधवारी रात्री आठ वाजता स्वामी माधव गिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. तर उद्या गुरुवारी शिवभक्त भाऊपाटील यांचे प्रवचन होईल.

सदर कार्यक्रमासाठी संत महंतांच्या भेटी होत आहे. यामध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत रामगिरीजी महाराज, महामंडलेश्वर काशीकानंदगिरीजी महाराज, मंत उद्धवजी महाराज, महंत रघुनाथ महाराज खटाणे, नामदेव बाबा महाराज, मंथ अरुणनाथ गिरीजी महाराज, राजेंद्रगिरीजी महाराज, निवृत्ती महाराज चव्हाण व गणपत महाराज लोहाटे यांचा सदिच्छ भेट व आशीर्वादाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता स्वामीजींच्या समाधीची महापूजा,५.३० वा नित्यनियम विधीपठण, पहाटे ६.१५. वा आरती व सकाळी ९ते१२ वा राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या पादुका पूजन आणि सत्संग होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वामी माधवगिरीजी महाराज ,महंत रमेशगिरीजी महाराज तसेच सर्व संन्यासी साधू संत उपस्थित राहणार आहे. संत महंतांचा सत्संगाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता आमटी भाकरीचा महाप्रसाद आलेल्या भाविकांना मिळणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिला व पुरुष भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त महंत रमेशगिरीजी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलासआबा कोते, सचिव अंबादास अंत्रे, त्रिंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे ,संदीप चव्हाण, अतुल शिंदे ,शिवनाथ शिंदे , व्यवस्थापक विजय जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here