राष्ट्रीयस्तर नृत्य स्पर्धेत वेदिका एरंडे प्रथम 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

         नागपूर येथे भारतीय नृत्य नटराज संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीयस्तर नृत्य स्पर्धेत अकोले येथील वेदिका सुनील एरंडे हिने बॉलिवूड नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

         नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेमध्ये वेदिका हिने बॉलीबुड प्रकारात उत्कृष्ट नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.  वेदिका हिने या अगोदर जिल्ह्यातील अनेक नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून तिला नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

            या यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे मधुकरराव नवले, उपाध्यक्षा डॉ. जयश्री देशमुख, संस्थेच्या सहसचिव तथा प्राचार्या अल्फोंसा डी, कोषाध्यक्ष विक्रम नवले यांनी कौतुक केले. वेदिका हिस नृत्यशिक्षिका काव्या कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here