राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार

0

भविष्यात राजकारणात चर्मकार समाजाचा मोलाचा वाटा असेल-राजेंद्र बुंदेले

      नगर – जेव्हा समाज शिक्षित होतो तेव्हा सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्रात देखील त्याचे कार्य हे दिसून येत असते. आणि संविधानिक एखादे पद त्याला मिळणे म्हणजे हीच त्याच्या कामाची पावती असते. आज 35-36 ग्रामपंचायतीमधून 15-16 सदस्य हे चर्मकार समाजाचे असणे म्हणजेच चर्मकार समाजाचा अभिमान आणि त्या त्या गावातील लोकांनी चर्मकार समाजावर दाखवलेला विश्वास हा होय. संपूर्ण महाराष्ट्रात हिच परिस्थिती दिसून येत असून भविष्यात लोकसभा आणि विधानसभा मध्ये चर्मकार समाजाचे बहुमत राहील, अशी आशा National Tanners Federation राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक राजेंद्र बुंदेले यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ, National Tanners Federation शेवगाव तालुक्याच्यावतीने, महात्मा वाचनालय, बाजार तळ, शेवगाव, येथे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक राजेंद्र बुंदेले, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ भाऊ कवडे, कार्याध्यक्ष भाऊराव कांबळे उपाध्यक्ष दादासाहेब पाचरणे, सचिव रविशेठ हनवते, युवक अध्यक्ष महेश (बंटी) शेवाळे, शहराध्यक्ष शुभम भैय्या बनस्वाल आदि मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सद्गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्य सन्माननीय, लक्ष्मण टाचतोडे (शिंगोरी), दादासाहेब भानुदास गाडेकर (वडुले खुर्द), किशोर भारत कवडे (आव्हाने बु.), कानिफनाथ अशोक तेलोरे (खरडगाव), भानुदास लक्ष्मण नन्नवरे (खरडगाव), विलास विष्णू शिंदे (वडूले बु.), मथुराबाई सिताराम बोरुडे (शहर टाकळी) आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रसंगी शासनातर्फे पीच परवाना, स्टॉलचे वाटप आणि महामंडळाकडून मिळणार्‍या कर्जाबाबत, घरकुल आणि विविध सवलतीबाबत तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याबाबत नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष उदमले यांनी सविस्तर अशी माहिती समाज बांधवांना दिली.

     कार्यक्रमास देवमनदादा बांगरे, तुषार बनस्वाल, मुकुंद गोरख वाघमारे, योगेश सुरेश हनवते, डॉ. किशोर जाधव, डॉ. दिलीप जाधव, हितेश परदेशी, संजय तेलोरे , संजय परदेशी, मनोज बन्सवाल , किरण जाधव, सचिन चव्हाण, आदी सह चर्मकार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here