राष्ट्र विकासासाठी तरुणाईचे योगदान हवे : तहसीलदार नामदेव पाटील

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

             राष्ट्र विकासासाठी तरुणाईचे योगदान हवे आत्मविश्वास ठेवा आनंदी रहा,शिक्षणाबरोबरच चांगले व्यक्ती बना. असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले.
             देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे केले.कै.प्रभावती तुकाराम जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या भगिनी रत्नमाला दत्तात्रय कडु यांच्या वतीने विद्यार्थांचा व्यक्तीमत्व विकसीत व्हावा या हेतुने देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
               

यावेळी अध्यक्ष पदावरून तहसीलदार नामदेव पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्याधन हे सर्वात मोठे असुन आपली जिद्द व आत्मविश्वास आपल्याला यशाच्या उच शिखरावर पोहचवतो कोणाला एखादया विषयात कमी गुण मिळाले असतील मात्र तो खेळात आपले ध्येय साध्य करु शकतो कष्ट केल्या शिवाय यश मिळत नाही सामुहीक कामातून यश लवकर मिळते.

लहान वयात घरातील छोट्या मोठ्या कामात आपल्या आई वडिलांना मदत करा वाईट मित्राची संगत करु नका व आपले आदर्श चांगले असुद्या पाण्याचा माठ दगडाला झिजून आपली जागा निर्माण करतो तशी आपली जागा तयार करून यशस्वी व्हा रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत आपली काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असावी.
          यावेळी माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु,पत्रकार शिवाजी घाडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर,रत्नमाला कडु,ज्योती कोरडे,संपत ढोकणे, आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here