राहाता तालुक्यातील अडीचशे लाभार्थ्यांना मिळकतपत्रिकेचे वाटप

0

शिर्डी, दि.१८ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत देशभरातील ६५ लाख लाभार्थ्यांना आभासी पद्धतीने मिळकतपत्रिके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राहाता पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील १०० लाभार्थ्यांना मिळकतपत्रिकाचे (प्रापर्टी कार्ड) वाटप करण्यात आले. तर तालुक्यातील इतर गावात झालेल्या शिबिरात १५० मिळकतपत्रिकांचे वाटप करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना मिळकतकार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी भाऊसाहेब अहिरे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात आदी उपस्थित होते. 

राहाता पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छता व नशामुक्तीची शपथ घेण्यात आली.  मिळकतपत्रिका वाटप झालेले लाभार्थी गोगलगाय, आडगाव बुद्रुक व आडगाव खुर्द या गावातील होते.  वाळकी, डोहाळे व निघोज या गावात‌ शिबिराद्वारे प्रत्येकी ५० मिळकतपत्रिकेचे वाटप करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here