राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांची बदली,चंद्रसिग राजपूत नवीन तहसीलदार

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

            राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर मालेगाव येथुन बदलून आलेले चंद्रसिग राजेंद्रसिंग राजपूत राहुरीच्या महसूलचे नवे  कारभारी म्हणुन काम पाहणार आहेत.

               राहुरीत तहसीलदार म्हणून चार वर्षाहून अधिक कार्यकाळ पार पडणारे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी कोविडसह पुरजन्य परिस्थीतीत तसेच आपत्ती काळात उत्तम प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील उत्तम प्रशासक म्हणून तहसीलदार शेख यांचा गौरव केला होता. शेतक-यांच्या निगडीत असलेल्या रस्ता केसमधे सर्वाधिक रस्ते खुले करून शेतक-यांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे.

               मालेगाव येथुन बदलुन आलेले नविन तहसीलदार चंद्रसिग राजेंद्रसिंग राजपूत हे राहुरीचा सोमवारी पदभार स्विकारतील अशी माहीती सुञाकडुन मिळाली आहे. राहुरीत नव्याने आलेले तहसीलदार चंद्रजीत राजपुत याचा कार्यकाळ कसा असणार याकडे लक्ष लागले आहे. राजपूत यांचीही तहसीलदार शेख यांच्याप्रमाणेच उत्तम प्रशासक अधिकारी म्हणून ओळख आहे. मालेगाव येथे काम करत असताना अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी मार्गी लावले. मात्र काही प्रमाणात स्थानिक मंत्री व आमदार, माजी आमदार, विविध संघटना यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र तरीही न डगमगता जनता केंद्रस्थानी समजून कामाचा तडाखा सुरूच ठेवला.शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांची महसुल प्रशासनात ओळख आहे.

जयंत पाटील यांच्या कारखान्यावर केली कारवाई

             शेकाप नेते जयंत पाटील यांच्या रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये रक्कम थकीत होती. थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी एस. जे. शुगरची २३ कोटी ७१ लाख रुपयांची साखर, ३५ लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस व बॅगस असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज सील करून ताब्यात घेतला होता. या कारवाईने राज्यातील सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कायद्याच्या चौकटीत काम करणारा अधिकारी असल्याने राजकिय नेत्यांचे व नविन तहसीलदार यांचे सुञ बसेल का?

 ७३ बीएलओं विरोधात गुन्हा दाखल केला

                 मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम असताना या कार्यक्रमासाठी ३३१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती. यापैकी ७३ बीएलओंनी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाकडे पाठ फिरविली होती. या प्रकाराची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी गंभीर दखल घेत संबंधित बीएलओं विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सामाजिक दायित्व जोपसणारा अधिकारी

               मालेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देण्याचे काम सुरू असताना दहीवळ येथील आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील ९ वर्षाचा चिमुकला तापाने फनफणला असता तहसीलदार राजपूत यांनी त्याच्या आजीकडे दवाखान्यात नेले नाही का? अशी चौकशी केली असता पैसे नसल्याचे आजीने सांगितल्यावर तहसीलदार राजपूत यांनी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्या मुलाला उपचारासाठी दाखल केले. चार दिवस या मुलावर उपचार करण्यात आले.उपचार सुरु असताना वेळोवेळी तहसीलदार राजपूत भेट देऊन तब्येतीच चौकशी केली. त्या मुलाचे रुग्णालयाचे  संपूर्ण बिल तहसीलदार राजपूत यांनी अदा करून त्या मुलाला सुखरूप घरी पोहोच केले. सामाजिक दायित्व जोपासणारा अधिकारी रजपुत यांची ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here