कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यासाठी शनिवारी राहुरीत सर्व पक्षीय संघटनांचा रास्तारोको आंदोलन
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथिल धर्मांतर प्रकरणी नागपूर अधिवेशनात आ.राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडली त्या दरम्यान ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणात तपासात हलगर्जीपणा व आरोपीला मदत केल्याचा पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर आरोप करण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून 15 दिवसांत उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पो.नि.दराडे यांची चौकशी करण्याचे व तातडीने नगर नियंञण कक्षात बदलीचे आदेश काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.हे वृत्त राहुरीत धडकताच विविध संघटनांनी राजकारणाचा बळी असल्याची चर्चा सुरु होती. खमक्या अधिकाऱ्यावर अन्याय झाल्याने शनिवार दि.24 रोजी राहुरी येथिल नगर मनमाड महामार्गावर सर्व पक्षीय संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात तालुक्यातील विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.दरम्यान राहुरी पोलिस ठाण्यासमोर 3 वा. पिंटूनाना साळवे व सचिन साळवे या दोन तरुणांनी बदलीच्या निषेधार्थ स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यात ब्राम्हणी गावात भाजीपाला विक्री करणारी महिलेस धर्मांतर करण्यास भाग पाडून आरोपी कमलेशसिंग याने महिलेचा विनयभंग केला.याबाबतचा गुन्हा दाखल करताना टाळाटाळ करुन त्या महिलेस तुझा कुठे विनयभंग झाला. तुला पैसे देतो प्रकरण मिटवून घे.असे दराडे यांनी सांगितले. या महिलेच्या हातातील बांगड्या दराडे यांच्या समोर कमलेशसिंग याने फोडल्या आहेत.हिंदु महिलेच्या बांगड्या तीच्या पतीच्या निधना नंतर फोडल्या जातात.असे असताना पोलिस निरीक्षक दराडे यांनी कमलेशसिंग याचा प्रवास प्रमुख म्हणून काम केले आहे.दराडे यांनी पालघर, पुणे व इतर ठिकाणी नोकरी करताना धर्मातर करण्यास मदत केली आहे.यातुन मोठी संपत्ती गोळा केली आहे.दराडे यांच्या संपत्तीची चौकशी करणार का?त्यास निलंबित करणार का? धर्मातर विरोधी कायदा आणणार का?असे आ.सातपुते यांनी लक्षवेधीच्या वेळी मांडले आहेत.
विधिमंडळात आ.सातपुते यांच्या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितले की,राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात भाजी विक्री करणाऱ्या महिलेवर दबाव आणून कमलेशसिंग याने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच कारवाई करणे गरजेचे होते.अधिकाऱ्यांने हलगर्जीपणा केल्यामुळे कमलेशसिंग याने अटकपुर्व जामिन मिळविला आहे.दराडे यांची 15 दिवसात अप्पर पोलिस अधिक्षक अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.दराडे यांना नियंञण शाखेत पाठविण्यात येत आहे. असे गृहराज्यमंञी शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात सांगितले आहे.
पो.नि.दराडे यांच्या बदलीचे वृत्त सोशल मिडीयावरुन व्हायरल झाल्या नंतर दुपारी 3 वा.राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात पिंटूनाना साळवे व सचिन साळवे या दोन तरुणांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे.या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी काही महिन्यातच राहुरी तालुका हद्दीत अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद केले. छेडछाडीवर आळा घालण्यात त्यांना यश येत आहे. त्यांचे कामकाज हे उल्लखणीय असून अशा अधिकाऱ्याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. ही मागणी तालुक्यात जोर धरु लागली आहे. दराडे यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी दिला आहे.
खमक्या अधिकाऱ्यावर अन्याय झाल्याने शनिवार दि.24 रोजी राहुरी येथिल नगर मनमाड महामार्गावर सर्व पक्षीय संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात तालुक्यातील विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.या आंदोलनात ठाकरे सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, यांच्यासह विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहे.