राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना उंबरे येथील राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला चौकशीला बाधा येवू नये म्हणून जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जाधव यांना पुढील आदेश येई पर्यंत अहमदनगर नियंत्रण कक्षात काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

              उंबरे येथील गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीसांच्या भुमीकेबाबत राष्ट्रीय बाल अधिकार, संरक्षण आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्याबाबत आयोगाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी प्रक्रीया सुरु असल्याने पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांची चौकशी कामी अडचण ठरु नये म्हणून राहुरी पोलिस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकारी यांच्याकडे देवून राहुरी पोलीस स्टेशनला जाधव यांना  कार्यरत ठेवणे न्यायोचित होणार नसल्याने विशेष पोलीस निरिक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडील संदर्भ क्र. ४ अन्वये पोलीस निरिक्षक धनंजय अनंतराव जाधव यांची पुढील आदेश होई पर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात पोलीस नियंत्रणकक्ष अहमदनगर येथे नेमणुक करण्यात आली आहे.

         दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून राहुरी पोलीस ठाण्यातील विविध पोलीस निरीक्षक आपला कालावधी पूर्ण न करता वेगवेगळ्या चौकशीत गुंतूले जात असल्याने बदली होत आहे. पोलीस निरीक्षक जाधव यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून त्यांच्याशी सुसंवाद साधत आपली वेगळी छाप पाडली होती.अनेक गुन्ह्माचा तपास योग्य रीतीने करून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्यांची नगर कंट्रोलला बदली झाल्याने पुन्हा एकदा राहुरीत गुन्हेगारी डोके वर काढणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here