राहुरीच्या पुर्वभागात दुध भेसळ आड्डयावर‌ छापे! अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0

देवळाली प्रवरा  / प्रतिनिधी

        राहुरी तालुक्यात कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या पुर्व भागातील एका शेडमधे  भल्या पहाटे  दुध भेसळ होत असल्याच्या गुप्त बातमीच्या आधारे  अन्न औषध प्रशासनास पथकाने दोन ठिकाणी अन्न छापा मारला असता दुधात भेसळ करणारे संशयास्पद रसायन व साहित्य मिळाले असुन राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरु होते.

 माहिती पोलीस सूत्रांकडुन‌ मिळालेल्या माहिती नुसार राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन आरडगाव रोड लगत खाटकर व म्हसे वस्ती परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पहाटे तिन ते चार वाजे दरम्यान छापा मारला या छाप्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दुधात भेसळ करणारे संशयास्पद साहित्य व दुधाचे नमुने ताब्यात घेतले व पंचनामा केला  .सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे ,अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, प्रदिप पवार अदिंनी हि कारवाई केली.

                 दुध डेअरीवर पथकाने छापा टाकताच दुधात भेसळ करणारे पसार झाले असून त्यांचे नाव दुपारी उशिरापर्यंत समजले नसून याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राहुरी तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी, शिलेगाव,कात्रड,कोढवड अदि भागात गेली‌ अनेक दिवसांपासून सर्रासपणे दुधात भेसळ सुरू असल्याचे बोलले जात आहे तर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने यापुर्वी कारवाई केली आहे मात्रा पुन्हा हे दुधात भेसळ करणारे उजाळ माथ्याने दुधात केमिकलचा वापर करत दुध भेसळ करत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने याभागातही कारवाई करावी‌ अशी मागणी होत आहे.

चौकट…!

राहुरी तालुक्यात दुध भेसळीच्या माध्यमातून अनेक दुध संकलन‌ करणाऱ्यांनी अल्पवधीतच कोट्यावधी रुपयांची माया गोळा करून अलिशान गाड्या व बंगले बांधले असुन समाजात प्रतिष्ठीत असल्याचे दाखवले जात आहे.दुध भेसळीत दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालुन चौकशी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

चौकट….

अन्न भेसळ पथकाने भेसळयुक्त दुध तयार करणाऱ्या डेअरीवर छापा टाकला आहे. राहुरी पोलिस स्टेशनला राञी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असुन या डेअरी वरुन भेसळयुक्त दुधाचे  नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.  तसेच दुध भेसळ होत असेल तर अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

                            संजय शिंदे,   सहाय्यक आयुक्त ( अन्न व औषध प्रशासन  )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here