राहुरीत पोलीस अधिकारी आणि गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यात कारवाईवरून वाद

0
फोटो ओळी 1)  पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना नाऱ्हेडा यांनी कार्यकर्त्यास मिठी मारुन व अंगाला झटून आतमध्ये घेण्याची भाषा करीत होते. 2)  पोलिस ठाण्याच्या आवारात हिंदु गो रक्षक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 राहुरी येथिल हिंदु गोरक्षक संघटनेत काम करणाऱ्या  रोहन विक्रम डहाळे याच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंट वरुन  मुस्लीम समाजाचा विरोधात आक्षेपार्ह मचकुर टाकल्याने मुस्लीम समाजाच्या काही तरुणांनी तु आमच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह मचकुर टाकला का याची विचारणा करीत असताना हे माझे अकाऊंट नसल्याचे सांगत असतानाच दहा ते पंधरा मुस्लीम समाजाच्या तरुणांनी घरात घुसुन मायलेकास बेदम मारहाण केली. यावेळी राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी जमाव पांगवताना हिंदु समाजाच्या तरुणांना अश्लिल शिवीगाळ करुन खालच्या पातळीच्या भाषेत बोलुन उलट हिंदु समाजाच्या एका तरुणाला मिठी मारुन जेल मध्ये टाकण्याची  भाषा केल्याने तरुणांनी राहुरी पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली.

            याबाबत समजलेली माहिती अशी की,राहुरी येथिल सोनार गल्लीत राहणारा रोहन विक्रम डहाळे हा त्याच्या घरी असताना मुस्लीम समाजाचे दोन तरुण परवेज शेख, रा. खाटीक गल्ली, ता. राहुरी हे घरा समोरुन जात असताना रोहन डहाळे यास  इंस्टाग्रामच्या ग्रुपवरुन मुस्लीम धर्मा बददल काही आक्षेपार्ह मजकुर का टाकतो असे विचारले असता. रोहन याने हे इंस्टाग्राम अकाऊंट बनावट आहे.हे सांगत असतानाच आल्फाज शेख,रा.खाटीक गल्ली याच्यासह मुस्लीम समाजाचे दहा ते पंधरा तरुण हातात काठ्या, गज, फायटर घेवून आले. रोहन यास मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी रोहन जखमी झाल्याने त्याची आई रुपाली विक्रम डहाळे या मध्ये आल्या असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली.मुस्लीम समाजाच्या तरुणांनी हिंदु गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यास मारहाण झाल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस ठाण्याच्या आवारत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले.सोनार गल्लीत मुस्लीम समाजाचे तरुण हिंदु गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यास मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली असता.पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहचले.घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदु गोरक्षक संघटनेच्या कार्कर्त्यांना पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी खालच्या भाषेत जावून शिविगाळ केली. या घटनेमुळे वातवरण तंग झाले होते.मुस्लीम व हिंदु समाजाचा तरुणांचा मोठा गट पोलिस ठाण्यात जमा झाला.राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांची पुन्हा हिंदु गो रक्षक  कार्यकर्त्याशी बाचाबाची झाली.यावेळी नाऱ्हेडा यांनी एका कार्यकर्त्यास मिठी मारुन याला आत घ्या याचीच जिरवू असे म्हणून त्या तरुणाला ओढत नेण्याचा प्रयत्न केला.यामुळे हिंदु गो रक्षक संघटनेचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले.

                  या घटनेची माहिती पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांना समजाताच ते तातडीने राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले.यावेळी मुस्लीम समाजाचा गट पोलिस ठाण्याच्या आवारातून निघून गेले होते.हिंदु गो रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन गुन्हा दाखल करुण घेण्याचे आदेश दिले.रुपाली विक्रम डहाळे यांच्या फिर्यादी वरुन परवेज शेख,आल्फाज शेख, (दोघे रा. खाटीक गल्ली राहुरी)या दोघांसह दहा ते पंधरा अनओळखीच्या मुस्लीम तरुणां विरोधात लाकडी,गज, दांडा, फायटर मारुन जखमी केले.जिवे मारण्याची धमकी दिली.या मारहाणीत आकरा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ओढुन नेली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहे.

...त्यांच्या मध्यस्तीने माफी मागितल्याने……

           राहुरी सोनार गल्लीत मुस्लीम समाजाच्या तरुणाने हिंदु गो रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यास मारहाण करण्यात येत असताना उपस्थित असलेल्या हिंदु गो रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी खालच्या भाषेत बोलुन व शिविगाळ केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी कार्यकर्त्याच्या भावना समजुन घेत कार्यकर्ते व पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे व पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांची बंद खोलित बैठक घेवून त्या कार्यकर्त्यांची पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांनी बंद खोलितच माफी मागितली परंतु बंद खोलितील चर्चा बाहेर सांगायची नाही.असाही नाऱ्हेडा यांनी फर्मान सोडले.परंतू ते पाच ते सात कार्यकर्ते बाहेर आल्यावर नाऱ्हेडा यांनी माफी मागितल्याचे इतर उपस्थित कार्यकर्त्यांना सांगत होते.

….तो प्रकार गैरसमजुतीतून…

           घटनास्थळी व पोलिस ठाण्यात जमाव पांगवताना कार्यकर्त्यास बोहेर जाण्यास सांगितल्याचा राग आला.कोणत्याही कार्यकर्त्यांस अपशब्द वापरले गेले नाही.कार्यकर्त्यांचा गैरसमज दुर केल्याने पोलिस उपनिरीक्षक नाऱ्हेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर पडदा पडल्याचे पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here