राहुरीत १ लाख ६० हजार रूपयांची वीज चोरी पकडली ,गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

      राहुरी येथील नगर- मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल मैत्री पार्क येथे आकडा टाकून महावितरण ची १ लाख ६० हजार रूपयांची विज चोरून वापरल्या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

         याबाबत महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, बकुळ रामदास मानवटकर  यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, विशेष विजचोरी मोहिमे अंतर्गत महावितरण उपविभाग देवळाली प्रवरा कार्यक्षेत्रा अंतर्गत गुहा बु. या गावाच्या शिवारात दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण च्या भरारी पथकाने गुहा बु. गावाच्या शिवारात चंद्रकांत महादेव उभे यांचे येथील वीजवापरदार रविंद्र योसेफ जाधव याच्या अ. नगर मनमाड हायवे लगत असलेल्या हॉटेल मैत्री पार्क येथिल अनाधिकृत वीजवापर उघडकीस आणण्यासाठी अचानक तपासणी केली असता प्रथम दर्शनी सदर ठिकाणी महावितरणचा अधिकृत वीज पुरवठा घेतलेला नसल्याचे समजले. मात्र पुढील तपासणीत सदर हॉटेल मैत्री पार्क वीज उपकरणे चालु स्थितीत दिसत होते. म्हणुन अधिक तपासणी केली असता सदर हॉटेलच्या बाजुला असलेला महावितरणचा वीज पुरवठा करणा-या लघुदाब वीज वाहिणीवर अनाधिकृत आकडा टाकुन सदर हॉटेल मधील उपकरणाना वीज पुरवठा केलेला होता. 

           सदर बाब ही वीजवाहिणीवर आकडा टाकुन वीज चोरीची असल्याची वीज वापरणाऱ्यांना सांगुन सदर ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करुन वीज चोरीसाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करण्यात आली. त्यांनी महावितरण कंपणीचे एका वर्षात एकुण ७,२३८ युनिटची चोरी केलेली आहे. वीज चोरीची एकुण किमंत रुपये १ लाख ६० हजार ४५० इतकी होत असुन चंद्रकांत महादेव उभे व रविंद्र योसेफ जाधव यांना दंडासह वीज चोरीचे बिल भरण्यास सांगितले परंतू त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला नसल्याने वीज चोरीची रक्कम त्याच्या कडुन येणे बाकी आहे. त्यांना महावितरण कंपनी कडुन वीजचोरी व तडजोडीचे देयक देण्यात आलेले आहे. परंतु त्यांनी अदयाप त्याचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आरोपी चंद्रकांत महादेव उभे यांचे येथील वीजवापर दार रविंद्र योसेफ जाधव याच्या विरुध्द गुन्हा रजि. नं. ४०७/२०२३ भारतीय वीज कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here