राहुरी तालुक्यातील शेकडो शिधा पत्रिका धारक रेशनपासून वंचित

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात धान्य वितरणासाठी अवघे सहा दिवस मिळाले.कमी दिवसात सर्व शिधापञिका धारकांना धान्य वितरण करता आले नाही. प्रत्येक धान्य दुकानदारांचे शंभर पेक्षा जास्त कुटुंब धान्या पासुन वंचित राहिले आहे.1 आँक्टोबर पासुन सप्टेंबर महिन्याचा डाटा रद्द झाल्याने आँक्टोबर महिण्यात सष्टेबरचे धान्य देता आले नाही. माञ आनंदचा शिधा डाटा माञ आँक्टोबर महिन्यात चालु ठेवण्यात आला होता. राहुरीच्या तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांनी माञ जिल्हाधिकारी यांच्या परवानगीसाठी कोणताही पञव्यहार न केल्याने तालुक्यातील अनेक कुटुंबे धान्या पासुन वंचित राहिले गेलेत.केदार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना जिल्हाधिकारी यांची परवागी घेणार असल्याचे सांगितले परंतू कागद माञ कुठे काळा केला नसल्याने राहिलेले धान्य काळा बाजारात जाणार होते का?प्रश्न सर्वसामान्य कुटुंबे विचारु लागले आहेत.  

               सप्टेबर महिन्यात धान्य वाटपासाठी 24 सप्टेंबरला सुरवात करण्यात आली अवघ्या सहा दिवसात धान्य वितरण करण्यास सांगितले गेले. सहादिवसात सर्वच धान्य वितरण झाले नाही.एका धान्य दुकानाचे सुमारे 100 ते 150 शिधापञिका धारक धान्या पासुन वंचित राहिले आहेत.1 आँक्टोबर रोजी धान्य वितरणाचा डाटा लाँक केल्याने आँनलाईन बिल निघत नसल्यामुळे शिधापञिका धारकांना धान्य वितरण करता आले नसल्याचे धान्य दुकानदारांनी सांगितले.याबाबत वृत्तपञातून आवाज उठविण्यात आला असता राहुरीचे पुरवठा अधिकारी केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेवून राहिलेल्या शिधापञिकांचे धान्य वितरण करण्यात येईल.असे सांगितले होते.परंतू  पुरवठा अधिकाऱ्यांने माञ अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासाठी कागद काळा केला नाही.

         

 या बाबत राहुरीचे तहसिलदार नामदेवराव पाटील यांच्याकडे चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता तहसिलदार यांनी माञ मिटींग मध्ये असल्याचे सांगुन रेशनचा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.गोरगरीब धान्य पुरवठा पासुन वंचित राहिलेले असतानाही.तहसिलदार पाटील यांनी दखल न घेतल्याने शिधापञिका धारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे.राहुरी तालुक्यात धान्य वितरणाचा बोजवारा उडाला असुन धान्य दुकानदारांना धान्य वितरणासाठी उशिरा धान्य द्यायचे कमी दिवसात धान्य वितरण करता येत नसल्याने अनेक रेशन धारकांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार पुढे येत आहे.महिणा अखेरीस धान्य वाटपाचा डाटा रद्द होत असल्याने अनेक जण धान्या पासुन वंचित राहत आहे.मोफत मिळणाऱ्या धान्य वितरणाचा डाटा महिणा अखेरीस रद्द केला जातो. परंतू आनंदाचा शिधा प्रत्येक शिधापञिका धारकास मिळण्यासाठी आँनलाईन डाटा सुरु ठेवण्यात आले आहे.आनंदाचा शिधा  100 रुपयांमध्ये दिला जात आहे. आनंदाचा शिधा व मोफत धान्य वितरणात भेदभाव केला जात आहे.

               मोफत धान्य वाटपाचा डाटा रद्द करुन रेशन धारकांना वंचित ठेवण्याचा प्रकार रेशन वितरणांकडून होत आहे.धान्य घेण्यासाठी मोलमजुरी बुडून रांगेत उभे राहायचे दिवसभरात नंबर लागला तर ठिक नाहीतर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहायचे असा पाच ते सहा दिवस दिनक्रम चालुच ठेवावा लागतो.धान्य मिळेलच याची शाश्वती नृसल्यामुळे महिणा अखेर पर्यंत सर्वानाच  धान्य मिळाले नाही याची हमी नाही. तर मोफल धान्य मिळत नसल्याने गोरगरीब धान्या पासुन वंचित राहिला जात आहे.

चौकट 

राहुरीचे पुरवठा अधिकारी केदार नाँट रिचेबल.

           राहुरी तालुक्यात सप्टेंबर महिण्यात धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा उशिरा झाला आहे.धान्य वितरणासाठी अवघे सहा दिवस मिळाले आहेत. अनेक धान्य दुकानातुन मोफत  मिळणारे धान्या पासुन वंचित राहिले आहे.वृत्तपञाच्या प्रतिनिधीनी याबाबत पुरवठा अधिकारी केदार यांना विचारले असता. डाटा अद्यावत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी  घ्यावी लागेल. पंधरा दिवस उलटुनही जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी घेण्यासाठी कोणताच पञव्यवहार केला नसल्याचे समजते.सध्या पुरवठा आधिकारी केदार नाँट रिचेबल राहत असल्याने गोर गरीबांना धान्य मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here