राहुरी तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

       राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व सोनगाव येथील प्रवरा परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री गोपाळ चांदेकर यांनी दिली.

            राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व सोनगाव या ठिकाणावरील कारवाईत एकूण ०७ गुन्हे नोंद करण्यात आले असून १८६० ली. कच्चे रसायन व ७० ली हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु. ५५०४०/- इतकी आहे सदर कारवाईत इंदू सर्जेराव माळी (, देवळाली प्रवरा ) व संदीप मधुकर पगारे (सोनगाव) यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

            राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विभागीय उपआयुक्त अनिल चासकर , राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, गणेश पाटील,राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक नितेश शेंडे,यांचे मार्गदर्शनाखाली  निरीक्षक अनिल पाटील,निरीक्षक  संजय कोल्हे, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २. श्रीरामपूर, निरीक्षक गोपाल चांदेकर, श्रीरामपूर विभाग यांचे सह भरारी पथक क्र. २. श्रीरामपूर निरीक्षक बाळासाहेब हुलगे, कोपरगाव विभाग, श्रीरामपूर विभाग व संगमनेर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त पणे केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here