मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील; आ.तनपुरे
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शेताता पाणी भरण्यासाठी गेले असताना बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.या हल्ल्यात शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे ( वय ५५ वर्ष) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडनेर येथिल गव्हाणे वस्तीवरील शोभाचंद गव्हाणे हे पहाटे ४ वा. मकाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले असता मकाच्या पिकात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शोभाचंद पाण्याचे बारे मोडण्यासाठी वाकल्यावर बिबट्याने पाठीमागील बाजुने शोभाचंद गव्हाणे यांच्यावर झडप घातली.बिबट्याशी गव्हाणे यांनी एकाकी झुंज दिली. मोठ्याने आरडा ओरड केली.परंतू जवळपास कोणीच नसल्याने मदतीला कोणीही पोहचू शकले नाही.बिबट्याने गव्हाणे यांना विविध ठिकाणी चावा घेतल्याने गव्हाणे यांचा प्रतिकार कमी झाल्याने मानेचा भाग व पोटाचा पुर्ण भाग बिबट्याने खाल्ला आहे.पोटातील आतडे बाहेर आले होते.सकाळ पर्यंत शोभचंद गव्हाणे शेतातून घरी का परतले नाही हे पाण्यासाठी कुटुंबातील सदस्य पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात गव्हाणे यांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसल्याने शेतकरी वर्ग घटनास्थळाकडे धाव घेवू लागला.या घटनेमुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे.पोलीस व वनविभागाने संयुक्त पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या दुर्लक्षित भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून वनविभाग यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेनंतर वडनेर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे.
वनविभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी आणि पहाटे शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनानेही तातडीने या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मयत शोभचंद गव्हाणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण गव्हाणे यांचे ते चुलते होत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिबट्याने मानवी हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे.बिबट्याच्या हल्ल्या बाबत वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. घटनास्थळी विभागिय वन अधिकारी एस बी कंद यांच्यासह वन विभाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
गेल्या अनेक दिवसांपासून वडनेरसह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे. अनेक वेळा ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झालेले आहे. शेतकरी बांधवही रात्रीच्या वेळी पाणी भरण्यास जावे लागत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्याभरापासून पिंजरा लावण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. मात्र याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप येथिल ग्रामस्थांनी केला आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडा : माजी मंत्री तनपुरे
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संचार वाढला आहे. काही महिण्यापुर्वीय तालुक्यातील डिग्रस येथिल लहान मुलीस बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करुन एका जिवानशी मारले आहे. विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडून त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे खरं तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडले पाहिजे. जोपर्यंत बिबट्याबाबत ठोस निर्णय घेत नाही. व जिल्हा वनाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही.असा आक्रमक पावित्रा माजी मंत्री व आ. प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील.
वडनेर येथिल बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने माजी मंत्री व आ.प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडून त्याची दखल घेतली जात नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया आ.तनपुरे यांनी दिली आहे.