१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा घटके पर्यंत २४ पैकी ९ जणांनी अर्ज माघारी घेतली तर विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यासह १३ जण उमेदवारीच्या रिंगणात उभे आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. अपक्ष उमेदवार संदीप सोपान चोरमले, संतोष एकनाथ चोळके,विजय दत्तू साळवे,ज्ञानेश्वर बापूसाहेब मेहत्रे, सविता ज्ञानेश्वर मेहेत्रे यांनी तर लोकशाही पार्टीचे सोहम बापूसाहेब चिंधे यांनी अर्ज माघारी घेतले आहे.
भारतीय जनता पक्षाचे शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे, वंचित कडुन अनिल जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून ज्ञानेश्वर गाडे,यलगार पार्टीचे जयेश साहेबराव माळी, रिपब्लिकन पार्टी कडून प्रदीप प्रभाकर मकासरे , महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे साहेबराव पाटील म्हसे, आझाद समाज पार्टीचे सिकंदर बबन इनामदार ,अपक्ष अरुण भाकचंद तनपुरे, अल्ताफ इब्राहम शेख, इम्रान नबी देशमुख, डाॅक्टर जालिंदर घिगे, दीपक विठ्ठल बर्डे यापैकी आठ उमेदवार पक्षाकडून तर पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव पाटील व संध्या दळवी यांनी काम पाहिले.