देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी मतदार संघामध्ये राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.
राहुरी मतदार संघात मंजुरी मिळालेल्या विकास कामांबाबत माहिती देताना मा.आ. शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात 2515 निधी अंतर्गत मौजे बारागाव नांदूर नवीन गावठाण ते सत्यवान पवार रस्ता – 8 लक्ष, विजय गोपाळे ते ब्रह्मटेक रस्ता – 8 लक्ष, मौजे दरडगाव थडी म्हैसगाव व मायराणी ओढ्यावर पूल बांधणे – 8 लक्ष, मौजे डिग्रस हायवे ते फार्म कॉटर एक किमी रस्ता – 10 लक्ष, मौजे सडे हायस्कूल ते पानसंबळ मळा रस्ता -10 लक्ष, मौजे केंदळ खुर्द ग्रामपंचायत इमारत बांधणे -10 लक्ष, मौजे देसवंडी मायनर चारी दोन रेल्वे गेट ते तमनर आखाडा रस्ता खडीकरण करणे -10 लक्ष, मौजे आरडगाव मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सोय उपलब्ध करणे- 7 लक्ष, गुंजाळे ग्रामपंचायत नवीन इमारत – 10 लक्ष, मौजे सोनगाव ईजीमा 261 सोनगाव ते तांबेरे रोड -10 लक्ष, मौजे धानोरे सोनगाव चौक ते धानोरे घाट 10 लक्ष, मौजे वडनेर गावठाण रस्ता खडीकरण करणे 7 लक्ष, मौजे कोळेवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण शेड व कंपाऊंड करणे 7 लक्ष, मौजे गुहा गावठाण ते के.मा.पाटील वस्ती रस्ता 10 लक्ष, मौजे वांबोरी धामोरी बु ते खडंबे बु रस्ता 20 लक्ष, मौजे वांबोरी धामोरी बु ते दत्त मंदिर बोरवाडी रस्ता मजबुतीकरण 5 लक्ष असे एकूण 1 कोटी 50 लक्ष रुपये. नवीन जि.प.शाळा खोल्या निधी जि.प. शाळा दरडगाव 12 लक्ष, जि.प.शाळा महारुख वस्ती, तुळापूर 12 लक्ष, जि प शाळा कानडगाव 12 लक्ष, जि प शाळा बाभुळगाव 12 लक्ष असे एकूण 48 लक्ष रुपये. जनसुविधा निधी अंतर्गत मौजे सात्रळ येथे स्मशानभूमी विकास करणे 8 लक्ष, मौजे आरडगाव गावांतर्गत धसाळ- तनपुरे वस्ती ते जैतोबा मंदिर रस्ता मुरमीकरण 2 लक्ष, मौजे शिलेगाव येथे गावांतर्गत रस्ता करणे 3 लक्ष, मौजे तमनर आखाडा येथे गाव अंतर्गत तमनर आखाडा ते काटेवाडी रस्ता 3 लक्ष, मौजे वावरथ येथे ग्रामपंचायत आवारामध्ये परिसर सुधारणा करणे 4 लक्ष, मौजे म्हैसगाव स्मशानभूमी विकास करणे 4 लक्ष, मौजे टाकळीमिया येथे स्मशानभूमी विकास करणे 4 लक्ष, मौजे कोल्हार खुर्द स्मशानभूमी विकास करणे 4 लक्ष, मौजे वांबोरी वाल्मीक तीर्थ स्मशानभूमी विकास करणे 8 लक्ष असे एकूण 40 लक्ष रुपये. नागरी सुविधा निधी अंतर्गत मौजे ब्राह्मणी येथे बाजारतळ पेविंग ब्लॉक बसवणे 8 लक्ष, मौजे टाकळीमिया गावांतर्गत रस्ता 4 लक्ष, मौजे टाकळीमिया सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीट लाईट 4 लक्ष, मौजे बारागाव नांदूर मारुती मंदिर 5 लक्ष, मौजे राहुरी खुर्द अशोक शेटे घर ते तोडमल वस्ती रस्ता करणे 3 लक्ष, मौजे सात्रळ गावांतर्गत प्रगती पतसंस्था ते सोनगाव चौक पेठ रस्ता करणे 8 लक्ष, मौजे वांबोरी गावांतर्गत रामनिवास झंवर ते केशव शर्मा रस्ता 8 लक्ष असे एकूण 40 लक्ष रुपये. क वर्ग तीर्थक्षेत्र निधी अंतर्गत श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहाराबाद येथे भक्तनिवास परिसर सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक विकास कामे करणे 25.80 लक्ष, हासोबा देवस्थान ट्रस्ट सडे येथे परिसर सुशोभीकरण करणे 9 लक्ष, वीरभद्र देवस्थान साकुरचा बिरोबा वांबोरी येथे सुशोभीकरण करणे 9.90 लक्ष, महादेव संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट तिळापुर येथे परिसर सुशोभीकरण करणे 9.90 लक्ष, रेणुका माता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट मानोरी येथे भक्तनिवास व परिसर सुशोभीकरण करणे 15 लक्ष असे एकूण 69.60 लक्ष रुपये. जिल्हा नियोजन समिती ग्रामा/इजिमा 3054 निधी अंतर्गत मायनर चारी नंबर दोन रेल्वे गेट देसवंडी ते तमनर आखाडा ते पिंपरी अवघड शिवरस्ता ग्रामा 125 – 20 लक्ष, म्हैसगाव ते इनाम डोके वस्ती लेंभेवाडी ग्रामा 206 मजबुतीकरण व डांबरीकरण 20 लक्ष, डिग्रस ते केटीवेअर सरापाचा मळा विलास गोपाळे ते रडाई वस्ती बारागाव नांदूर रस्ता ग्रामा 109 मजबुतीकरण व डांबरीकरण 20 लक्ष, तांभेरे ते भवाळ वस्ती ते शेलार वस्ती ते चिंचोली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण इजीमा 264 – 40 लक्ष, पिंपळाचा ओढा ते किरण दिघे वस्ती मजबुतीकरण व डांबरीकरण ग्रामा 4 – 20 लक्ष, कनगर ते तांभेरे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे जिमा 261- 30 लक्ष, राठी ऑइल मिल ते पठारे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामा 164 – 20 लक्ष कात्रड ते चिडगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण इजीमा 66 – 20 लक्ष असे एकूण 1 कोटी 90 लक्ष, डिजिटल क्लासरूम निधी अंतर्गत जि प शाळा तांदुळवाडी, आरडगाव, शिरसाट वस्ती देसवंडी, दिघे वस्ती धानोरे, गावठाण गुहा, गणेगाव, बारागाव नांदूर, चिंचाळे, महादेव मंदिर सडे, टाकळीमिया, मुसळवाडी, बाभुळगाव, गावठाण कात्रड, गावठाण चेडगाव आदी ठिकाणी प्रत्येकी 2 लाख 60 हजार लक्ष, असे एकूण 36 लक्ष 40 हजार रुपये. अंगणवाडी शाळा निधी अंतर्गत सात्रळ माळरान अंगणवाडी शाळा, वरशिंदे वाबळेवाडी येथे नवीन अंगणवाडी शाळा, मुसळवाडी गावठाण येथे अंगणवाडी शाळा, मोरवाडी येथे अंगणवाडी शाळा, वांबोरी पटारे पागिरे वस्ती अंगणवाडी शाळा, खडांबे रेल्वे स्टेशन अंगणवाडी शाळा, ब्राह्मणी घेरुमाळ वस्ती अंगणवाडी शाळा, देसवंडी नवीन अंगणवाडी शाळा, डिग्रस नवीन अंगणवाडी शाळा आदी ठिकाणी प्रत्येकी 11.25 लाख असे एकूण 101.25 लाख रुपये. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत सन 2022-23 दलित वस्ती अंतर्गत ब्राह्मणी 40 लक्ष, केंदळ खुर्द 26 लक्ष, तमनर आखाडा 5 लक्ष, तांदूळवाडी 30 लक्ष, वांबोरी 39 लक्ष, कात्रड 21 लक्ष, गुंजाळे 8.50 लक्ष, उंबरे 15 लक्ष, धामोरी बु 11 लक्ष, बाभळगाव 10 लक्ष, खडांबे खुर्द 25 लक्ष, चेडगाव 10 लक्ष, मोकळ ओहोळ 10 लक्ष, दरडगाव थडी 2 लक्ष, म्हैसगाव 13 लक्ष, राहुरी खुर्द 10 लक्ष, सडे 8 लक्ष, टाकळीमिया 11 लक्ष, कोल्हार खुर्द 4.50 लक्ष, सात्रळ 70 लक्ष, धानोरे 16 लक्ष, कानडगाव 26 लक्ष असे एकूण 406 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. तालुक्याला या माध्यमातून राज्य शासनाचा सुमारे 10 कोटी 81 लाख 25 हजार रुपये इतका भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यात माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदारांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचे आभार मानले आहेत.