राहुरी रिपाई कार्यालयात नामविस्तार दिन उत्साहात साजरा

0

राहुरी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राहुरी तालुका जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” नामविस्तार दिन व शहिदांना अभिवादनाचा कार्यक्रम रिपाइं राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. प्रथम रिपाई राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. 

मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी मराठवाडा विद्यापीठाचा रक्तरंजित इतिहास कथन केला. तसेच दलितांच्या झालेल्या हत्या, दलित स्त्रियांवर झालेल्या अत्याचार, मराठा समाजातील शहीद तरुणाचे बलिदान,पोचीराम कांबळेचे झालेले हत्याकांड व पोचिराम चा स्वाभिमान, नामविस्तार करताना झालेली दलित जनतेची ससेहोलपट,आयु.प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, दलित चळवळीतील अनेक नेते व कार्यकर्ते यांनी केलेले कार्य, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा ‘लॉंग मार्च’ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन व त्यांना झालेला तुरुंगवास असे विविध विषय, नामांतराचा इतिहास आपल्या मनोगतात व्यक्त केला व सर्वांना नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहिदांना अभिवादन केले.

 त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. तूप विहिरे,मुख्याध्यापक विनीतकुमार कांबळे, रिपाई शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनाबाबत मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.      रिपाई तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी दलित चळवळीतील महत्त्वाचे ऐतिहासिक दिवस साजरे करून दलित तरुणांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे कथन केले. सर्वांनी अशा कार्यक्रमासाठी गट तट विसरून आंबेडकरी चळवळ राहुरी तालुक्यात जिवंत ठेवण्याचे कार्य करावे असे आवाहन केले.    शेवटी रिपाइंचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रविण भाऊ लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी युवा नेते सागर भाऊ साळवे, युवा नेते विवेक सगळगिळे,ग्रामसेवक साळवे,सुशील साळवे,नविन साळवे, रवींद्र शिरसाठ, राजू दाभाडे,जॉन सॅम्युअल, सचिन डहाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here