राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत कारण…

0

श्रीनगर : काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा लवकरच श्रीनगरमध्येही पोहोचत आहे. पण यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या ऐतिहासिक लाल चौकात भारताचा तिरंगा ध्वज फडकवणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या अखिल भारतीय काँग्रेस कमेटी (एआयसीसी) प्रभारी आणि पक्षाच्या खासदार रजनी पाटील मंगळवारी बोलताना म्हणाल्या, राहुल गांधी 30 जानेवारीला लाल चौकात नव्हे, तर श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात भारतीय ध्वज तिरंगा फडकवतील. एवढेच नाही, तर लाल चौकात तिरंगा फडकवणे हा आरएसएसच्या अजेंड्याचा भाग होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधीच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात विचारले असता पाटील म्हणाल्या, “लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या आरएसएसच्या अजेंड्यावर आमचा विश्वास नाही. तेथे तो (तिरंगा) आधीच डौलाने फडकत आहे.” या यात्रेच्या समारोपाचा मुख्य कार्यक्रम शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC), श्रीनगर येथे आयोजित करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here